---Advertisement---

अगग! टी२० विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला करायचा आहे ४ देशांचा दौरा, वेळापत्रक असेल खूप व्यस्त

On: बुधवार, मार्च 2, 2022 5:13 PM
Team-India
---Advertisement---

येत्या ऑक्टोबर महिन्यापासून पुरुषांचा टी२० विश्वचषक २०२२ (T20 World Cup 2022) होणार आहे. या टी२० विश्वचषकापूर्वी भारतीय संघाचे वेळापत्रक अतिशय व्यस्त असणार आहे. जून महिन्यात भारतीय संघ २ सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी आयर्लंड दौऱ्यावर (India Tour Of Ireland) जाणार आहे. आयर्लंड क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबतची माहिती दिली आहे. भारताव्यतिरिक्त न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेचा संघही आयर्लंडविरुद्ध क्रिकेट मालिका खेळणार आहे. 

२६ मार्च ते २९ मे या कालावधीत भारतीय क्रिकेटपटू इंडियन प्रीमियर लीग २०२२ (IPL 2022) मध्ये व्यस्त असतील. त्यानंतर जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भारतीय संघ आयर्लंडचा दौरा करेल. या दौऱ्यावर दोन्ही संघांमध्ये २ सामन्यांची टी२० मालिका खेळवली जाईल. डबलीन येथे २६ आणि २८ मार्च रोजी हे सामने होतील. सध्या भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध ३ सामन्यांची टी२० मालिका खेळल्यानंतर आता २ सामन्यांची कसोटी मालिका खेळण्याच्या तयारीत आहे.

विश्वचषकापूर्वी ४ महिन्यांमध्ये करणार ४ दौरे
आयर्लंडनंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना होईल. इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाला १ कसोटी, ३ टी२० आणि ३ वनडे सामन्यांच्या मालिका खेळायच्या आहेत. हा दौरा १ जुलै ते १७ जुलै दरम्यान चालेल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्याने या दौऱ्याची सुरुवात होईल. २०२१ मध्ये भारताचा संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी उभय संघांमध्ये ५ सामन्यांची कसोटी मालिका होणार होती. परंतु कोरोनामुळे शेवटचा कसोटी सामना स्थगित करण्यात आला होता. हाच सामना १ ते ५ जून २०२२ या कालावधीत होईल. या मालिकेत भारतीय संघ २-१ ने आघाडीवर होता.

हेही वाचा- रोहित आणि विराटचा मोहालीत कॅप्टन्सीचा कहर योगायोग, दोघांनीही येथूनच सुरू केलाय नवा प्रवास

इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय संघ ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये झिम्बाब्वेचा दौरा करेल. मात्र अद्याप या दौऱ्याबद्दल अधिकृत घोषणा झालेली नाही. तसेच सप्टेंबर महिन्यात भारतीय संघाला श्रीलंकेत आशिया चषक खेळण्यासाठी जायचे आहे. यावेळी ही स्पर्धा टी२० स्वरुपात खेळली जाणार आहे. आशिया चषकात भारतीय संघ जवळपास ५ सामने खेळेल.

त्यानंतर लगेचच ऑक्टोबर महिन्यात टी२० विश्वचषकाची सुरुवात होईल. १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर यादरम्यान ऑस्ट्रेलियातील मैदानांवर टी२० विश्वचषकाचे सामने होतील. अशाप्रकारे भारतीय संघाचे टी२० विश्वचषकापूर्वीचे वेळापत्रक अतिशय व्यस्त आहे.

भारताचा ब संघ आयर्लंड दौऱ्यावर जाणार
आयर्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी दक्षिण आफ्रिका संघ ५ सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेतील सर्व सामने ९ जून ते १९ जून दरम्यान खेळवले जातील. भारताला आयर्लंडनंतर लगेचच इंग्लंड दौऱ्यावरही जायचे असल्याने भारतीय संघातील अनेक स्टार खेळाडूंना आयर्लंड मालिकेसाठी विश्रांतीही मिळू शकते. थोडक्यात सांगायचे झाल्यास, भारतीय बोर्ड मुख्य संघाला आयर्लंड दौऱ्यावर न पाठवता ब संघाला पाठवण्याचा विचार करू शकते.

महत्त्वाच्या बातम्या-

रॉयची जागा भरण्यासाठी गुजरातकडे ‘या’ तीन वादळी फलंदाजांचे पर्याय; सामन्‍याला कलाटणी देण्यात माहिर

रोहित आणि विराटचा मोहालीत कॅप्टन्सीचा कहर योगायोग, दोघांनीही येथूनच सुरू केलाय नवा प्रवास

भारतीय दिग्गजाने आत्ताच कापले टी२० विश्वचषकासाठी ‘या’ गोलंदाजाचे तिकीट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---