---Advertisement---

सगळे आहेत फक्त तुझीच कमी..! भारताच्या ‘या’ प्रमुख गोलंदाजाच्या अनुपलब्धतेबाबत रहाणेचे मोठे विधान

On: मंगळवार, डिसेंबर 15, 2020 7:14 PM
---Advertisement---

भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याला सुरुवातीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील भारतीय कसोटी संघात संधी मिळाली होती. परंतु आयपीएल २०२० दरम्यान झालेल्या दुखापतीमुळे त्याचे स्थान संभ्रमात होते. अखेर कसोटी मालिकेची सुरुवात होण्यापुर्वी त्याला संघातून वगळण्यात आले. १७ डिसेंबरपासून ऍडलेड येथे दिवस-रात्र कसोटी सामन्याने मालिकेची सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने इशांतविषयी वक्तव्य केले आहे.

इशांतची उणीव भासेल- रहाणे
एका मुलाखतीत बोलताना रहाणे म्हणाला की, “भारतीय संघाकडे एकाहून एक मजबूत गोलंदाज उपलब्ध आहेत. तरीही इशांत शर्माची उणीव भासेल. मात्र त्याच्या गैरहजेरीत जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी हे वेगवान गोलंदाज उत्कृष्ट प्रदर्शन करतील. इशांत संघातील सर्व गोलंदाजांपेक्षा सिनियर आहे. पण उमेश यादव, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, बुमराह आणि शमी हेदेखील चांगले गोलंदाज आहेत. महत्त्वाचे म्हणजे, ऑस्ट्रेलियाविरुद्ध कशी गोलंदाजी करायची याचा त्यांना चांगला अनुभव आहे.”
तसेच गुलाबी चेंडूने खेळण्यात येणाऱ्या पहिल्या कसोटी मालिकेतही भारतीय गोलंदाज चांगली कामगिरी करतील, असा रहाणेला विश्वास आहे. याविषयी बोलताना तो म्हणाला की, “ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेची सुरुवात दिवसरात्र सामन्याने होणार आहे. त्यामुळे गुलाबी चेंडूने खेळण्यात येणाऱ्या या सामन्यात आम्हाला चांगल्या फॉर्ममध्ये राहून खेळावे लागले आहे. माझ्या मते, भारतीय गोलंदाज मिळून या सामन्यात कमीत कमी २० विकेट घेतील.”

विराटच्या अनुपस्थितीत रहाणे असणार कर्णधार
भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील केवळ पहिला सामना खेळणार आहे. त्यानंतर पालकत्त्व रजेमुळे तो मायदेशात परतेल. अशात उर्वरित तीन कसोटी सामन्यात उपकर्णधार अजिंक्य रहाणे संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी पार पाडेल.

महत्वाच्या बातम्या-

“इशांत शर्माची ‘ही’ खासियत, म्हणूनच भारतीय संघ त्याला शंभर टक्के मिस करेल”

“हा संघ जिंकेल २-१ ने मालिका”; शेन वॉर्नचे कसोटी मालिकेपूर्वी भाकीत

अब आयेगा मजा! रोहित झाला ऑस्ट्रेलियाला रवाना; खेळणार ‘इतके’ कसोटी सामने

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---