खेळामध्ये जय आणि पराजय तर होतच असतो. परंतु, कधीकधी एखाद्या संघाला हरवणे पण तितकेच गरजेचे असते. कारण त्या संघाने दुसऱ्या संघाला नेहमीच मात दिलेली असते किंवा संबंधित स्पर्धेत टिकूंन राहण्यासाठी तो विजय महत्त्वाचा असतो. अशात क्रिकेटप्रेमींना आपला संघ कधी त्या संघाला हरवतो याची उत्सुकता असते. असाच प्रसंग सध्या भारतीय संघासोबत झाला आहे.
भारताचा कट्टर प्रतिस्पर्धक पाकिस्तानचा संघ आहे. परंतु, भारतीय संघ नेहमीच आईसीसीच्या स्पर्धेत पाकिस्तानला हरवतोय. सध्या भारतीय संघाला आईसीसीच्या स्पर्धेत न्यूझीलंडचा संघ मात देतो आहे. परंतु विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्याद्वारे न्यूझीलंडला चितपट करण्याची नामी संधी भारतीय संघपुढे चालून आली आहे. या स्पर्धेत भारतीय संघ न्यूझीलंड संघाला मात देऊन आपले जुने हिशोब चुकते करतो का? यावर सर्वांचे लक्ष असणार आहे.
अखेरचा २००३ साली भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्ध जिंकला होता
सौरव गांगुलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने न्यूझीलंड संघाला २००३ च्या विश्वचषकात पराभूत केले होते. तो सामना भारतीय संघाने ७ गडी ठेऊन जिंकला होता. त्या सामन्यात झहीर खानने ४ गडी तर हरभजन सिंगने २ गडी बाद केले होते. त्या सामन्यानंतर भारतीय संघ कधीही आईसीसीच्या स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध जिंकला नाही.
पुढे न्यूझीलंड संघाने भारतीय संघाला २००७च्या टी-२० विश्वचषकात १० धावांनी हरवले होते. तसे २०१६च्या टी-२० विश्वचषकात सुद्धा भारतीय संघाला ४७ धावांनी मात दिली होती. तसेच २०१८ला भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर गेला असता भारतीय संघ २-० ने कसोटी मालिका हरला होता. ही कसोटी मालिका सुद्धा विश्व कसोटी चॅम्पिअनशिपचा भाग होती. म्हणून विराटसेनेला अंतिम सामन्यात न्यूझीलंडला पराभवाची धूळ चारण्याची चांगली संधी लाभली आहे. भारतीय संघाला येत्या विश्व कसोटी चॅम्पिअनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाला हरवून आपला जुना सूड पूर्ण करता येईल.
विश्व कसोटी चॅम्पिअनशिपचा अंतिम सामना १८ जून रोजी साउथम्पटन येथे सुरु होईल आणि २२ जून रोजी संपेल. या सामन्यानंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका सुद्धा खेळेल. त्या मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरुवात होईल.
या पूर्ण दौऱ्यासाठी निवडण्यात आलेला भारतीय संघ खालीप्रमाणे-
रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वाशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, केएल राहुल, रिद्धिमान साहा
महत्त्वाच्या बातम्या-
पहिल्या कसोटी चॅम्पियनशीप विजयासाठी कर्णधार विराटला कट्टर विरोधी संघातून ‘हा’ महत्त्वाचा सल्ला
स्मिथ-मॅक्सवेलसह दिग्गज खेळाडू घेऊ शकतात ‘या’ महत्त्वाच्या दौऱ्यातून माघार
अश्विनच्या प्रत्युत्तरावर मांजरेकरांनी त्याचीच घेतली फिरकी; म्हणाले, ‘अशी आकडेवारी माझंही मन दुखवते’