भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात 5 सामन्यांची टी-20 मालिकेला आजपासून (6 जुलै) सुरू होत आहे. मालिकेतील पहिला सामना हरारे स्पोर्ट्स क्लब येथे होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 4.30 वाजता चाहत्यांना हा रोमांचक सामना पाहता येईल. निवड समितीने झिम्बाब्वे दौऱ्यासाठी युवा खेळाडूंची निवड केली आहे.
झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी एक मोठी बातमी समोर येत आहे. वास्तविक, निवड समितीने झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेसाठी संघात एकूण 4 सलामीवीरांची निवड केली आहे. यामध्ये कर्णधार शुभमन गिल तसेच यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्मा यांच्या नावाचा समावेश आहे. अशा परिस्थितीत पहिल्या टी-20 सामन्यात कॅप्टन गिलसोबत डावाची सलामी कोण देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तुम्हालाही हाच प्रश्न पडला असेल, तर उत्तर जवळजवळ समोर आले आहे. वृत्तानुसार, आयपीएल 2024 मध्ये बॅटने धुमाकूळ घालणारा हैदराबादसंघाचा युवा सलामीवीर अभिषेक शर्मा गिलसोबत डावाची सुरुवात करू शकतो.
🚨 New opening pair alert 🚨
According to reports, Abhishek Sharma and Shubman Gill to open against Zimbabwe in the first T20I.#ZIMvsIND #ShubmanGill #AbhishekSharma pic.twitter.com/QCMocloEM4
— OneCricket (@OneCricketApp) July 5, 2024
शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा यांनी स्थानिक क्रिकेटमध्ये पंजाबकडून डावाची सुरुवात केली. एवढेच नाही तर हे दोन्ही खेळाडू एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. कदाचित मैदानात या जोडीचा अचूक समन्वय हेच मुख्य कारण असावे. तर तिसऱ्या क्रमांकावर ऋतुराज गायकवाडची वर्णी लागू शकते. तर चाैथ्या क्रमांकावर रियान पराग फलंदाजी करण्याची शक्यता आहे. असे झाल्यास रियान पराग आणि अभिषेक शर्मा आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना पहायला मिळतील.
झिम्बाब्वेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ (पहिल्या दोन सामन्यांसाठी): शुबमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे, साई सुदर्शन, जितेश शर्मा, हर्षित राणा
महत्तवाच्या बातम्या-
थालाची हवा; वाढदिवासाआधी चाहत्यांमध्ये भलतीच क्रेझ! इथे लावला चक्क 100 फुटी कट आऊट
मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महाराष्ट्रातील विश्वविजेत्या खेळाडूंना तब्बल इतक्या कोटींचं बक्षीस जाहीर
ईशान किशनने केला हार्दिकचा अनोख्या पध्दतीने अभिनंदन; गळाभेट घेत म्हणाला…