भारतीय क्रिकेट संघ हाँगकाँग सिक्स स्पर्धेत सहभागी होणार आहे. ही एक अतिशय मनोरंजक स्पर्धा आहे. यामध्ये सामना फक्त 10 षटकांचा असतो. प्रत्येक संघ 5-5 षटके खेळतो. यासोबतच एका संघात जास्तीत जास्त 6 खेळाडू खेळतात. आता टीम इंडिया या स्पर्धेत खेळणार आहे. दरम्यान याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. हाँगकाँग सिक्स टूर्नामेंट 1 नोव्हेंबर ते 3 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे.
स्पर्धा हाँगकाँगमधील टिन क्वांग रोड क्रिकेट मैदानावर होणार आहे. 1 नोव्हेंबर ते 3 नोव्हेंबर दरम्यान खेळवला जाईल. टीम इंडियाही या स्पर्धेत सहभागी होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या स्पर्धेत एकूण 12 संघ सहभागी होणार आहेत. टीम इंडियाही येथे खेळण्यासाठी जाणार आहे. मात्र, भारताकडून कोणते खेळाडू खेळणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. या खेळाचे नियम खूपच मनोरंजक आहेत. नवीन लोकांना क्रिकेटशी जोडणे हाही या स्पर्धेच्या आयोजनामागचा उद्देश आहे.
🚨 INDIA WILL PLAY IN HONG KONG SIXES FROM NOVEMBER 1st 🚨
– What a news for Indian cricket fans…!!!! pic.twitter.com/5eZpipcMER
— Johns. (@CricCrazyJohns) October 7, 2024
स्पर्धा रंजक होण्यासाठी त्याचे नियमही रंजक ठेवण्यात आले आहेत. एका सामन्यात फक्त 10 षटके असतात. एका संघाला 5 षटकांत फलंदाजीची संधी मिळते. त्याच वेळी, एका संघातील फक्त सहा खेळाडू मैदान घेऊ शकतात. यष्टिरक्षक वगळता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील प्रत्येक खेळाडूला एक षटक टाकावे लागते. पाच षटके संपण्यापूर्वी पाच खेळाडू बाद झाले. तर शेवटचा फलंदाज एकटाच फलंदाजी करतो
ही स्पर्धा खूप जुनी आहे. याची सुरुवात 1992 मध्ये झाली. मात्र निधीअभावी ते 2017 मध्ये बंद पडले. मात्र, आता स्पर्धा पुन्हा सुरू होणार आहे. महान भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा आणि शेन वॉर्न या स्पर्धेत खेळले आहेत.
हेही वाचा-
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 5 विकेट्स घेणारे टाॅप-5 गोलंदाज
टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 5 विकेट्स घेणारे टाॅप-5 गोलंदाज
कर्णधारपद सोडूनही बाबर आझमला फलंदाजीत अपयश! खराब रेकाॅर्डची केली नोंद