शनिवारी (२६ डिसेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात बॉक्सिंग डे कसोटी सामन्याला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर सुरुवात झाली आहे. या दोन देशांतील ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील हा दुसरा सामना आहे. तसेच हा सामना भारतासाठी खास ठरला आहे.
भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध हा १०० वा कसोटी सामना आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया हा दुसरा संघ ठरला आहे, ज्यांच्या विरुद्ध भारताने कसोटीमध्ये १०० किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळले आहेत. याआधी भारताने इंग्लंडविरुद्ध १२२ कसोटी सामने खेळले आहेत.
तसेच ऑस्ट्रेलियाच्या दृष्टीने पाहायचे झाल्यास भारत हा तिसरा संघ आहे, ज्यांच्याविरुद्ध ऑस्ट्रेलियाने १०० किंवा त्यापेक्षा अधिक कसोटी सामने खेळले आहेत. भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध आणि वेस्ट इंडीजविरुद्ध हा कारनामा केला आहे. इंग्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलियाने ३५१ सामने खेळले आहेत. तर वेस्ट इंडीजविरुद्ध ११६ कसोटी सामने खेळले आहेत.
#TeamIndia will play their ????th Test against Australia when the teams square off in the second Border-Gavaskar Trophy Test at the MCG, starting tomorrow. #AUSvIND pic.twitter.com/aXTj6kUvHl
— BCCI (@BCCI) December 25, 2020
भारताकडून सिराज आणि गिलने केले पदार्पण –
या सामन्यातून भारताकडून मोहम्मद सिराज आणि शुबमन गिलने पदार्पण केले आहे. शुबमन गिलला प्रशिक्षक रवि शास्त्री यांच्याकडून कसोटी पदार्पणाची कॅप मिळाली. तो कसोटीत पदार्पण करणारा भारताचा २९७ वा खेळाडू ठरला. तर सिराजला अनुभवी फिरकीपटू आर अश्विनने कसोटी पदार्पणाची कॅप दिली. तो २९८ भारतीय कसोटीपटू ठरला.
ऑस्ट्रेलिया मालिकेत आघाडीवर –
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात होत असलेल्या कसोटी मालिकेतील पहिला सामना ऍडलेड येथे पार पडला होता. हा सामना ऑस्ट्रेलियाने ८ विकेट्सने जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत विजय मिळवून ही आघाडी भक्कम करण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न असेल. तर भारत मालिकेत पुनरागमन करण्यासाठी आतुरलेला असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियाची ‘ही’ सुंदर स्पोर्ट्स अँकर आहे विराटची खूप मोठी फॅन; भारतात येऊन खायचेत ‘छोले- भटुरे’
‘भारतीय संघाने क्षेत्ररक्षणावर लक्ष देण्याची आवश्यकता’, माजी दिग्गजाने साधला निशाणा
‘भारतीय संघाने क्षेत्ररक्षणावर लक्ष देण्याची आवश्यकता’, माजी दिग्गजाने साधला निशाणा






