न्यूझीलंडच्या दौऱ्यानंतर भारतीय संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे. इंडिया ए संघ आधीच बांगलादेशला पोहोचला असून बांगलादेश ए संघासोबत चार दिवसीय सामन्यांची दोन अनाधिकृत कसोटी सामने खेळणार आहे. बांगलादेशच्या दौऱ्यात भारत तीन वनडे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. या मालिकांसाठी भारताचा संघ जाहीर झाला असून रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल आणि चेतेश्वर पुजारा हे संघात पुनरागमन करत आहेत.
न्यूझीलंड विरुद्ध वनडे मालिकेत खेळलेले शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar)हे देखील बांगलादेश दौऱ्याचा भाग आहेत. ते लवकरच संघासोबत ढाका येथे जोडले जाणार आहेत. या दौऱ्याला सुरूवात वनडे मालिकेने होणार असून पहिला सामना 4 डिसेंबरला खेळला जाणार आहे.
न्यूझीलंडच्या दौऱ्यात रोहितच्या अनुपस्थितीत भारताचे नेतृत्व धवनने केले होते. त्या दौऱ्यात भारताने तीन सामन्यांची वनडे मालिका 1-0 अशी गमावली.
बांगलादेश दौऱ्यात भारताला 4 डिसेंबरला पहिला, 7 डिसेंबरला दुसरा आणि 10 डिसेंबरला तिसरा वनडे सामना खेळायचा आहे. यानंतर पहिली कसोटी 14 डिसेंबरला खेळली जाणार आहे. या दौऱ्यात भारताच्या दोन्ही संघाचे नेतृत्व रोहितच करणार आहे. दुसरीकडे बांगलादेशच्या वनडे संघाचे कर्णधारपद तमीम इक्बाल याच्याकडे सोपवले आहे.
या मालिकेत जे दोन कसोटी सामने खेळले जाणार आहेत, ते आयसीसी कसोटी अजिंक्यपद 2021-23च्या स्पर्धेचा भाग आहे. हे दोन्ही सामने भारताने जिंकले अंतिम सामन्यात पोहोचण्याच्या आशा कायम राहतील.
बांगलादेश दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएल राहुल, रिषभ पंत, श्रीकर भरत, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज.
बांगलादेश दौऱ्यासाठी भारताचा वनडे संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शाहबाझ अहमद, केएल राहुल, रिषभ पंत, इशान किशन, कुलदीप सेन, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, दीपक चाहर.
बांगलादेश वनडे संघ- तमीम इक्बाल (कर्णधार), यासिर अली, नजमूल शांतो, शाकिब अल हसन, अफिफ होसेन, महमुदुल्लाह, मेहेदी हसन मिराझ, लिटन दास, अनामुल हक, मुशफिकुर रहिम, नुरुल हसन, मुस्तफिजुर रहमान, तस्किन अहमद, हसन महमूद, एबादोत होसेन, नसुम अहमद. Team India will soon reach Bangladesh with Rohit Sharma & Virat Kohli; Know the team and schedule in one click
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वेस्ट इंडिजविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा 57 वर्षाचा भन्नाट योगायोग! स्मिथ, लॅब्युशेनने पाडला धावांंचा पाऊस
ही तर फक्त सुरुवात आहे! इंग्लंडच्या फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांचा घेतला समाचार, ठोकल्या ‘इतक्या’ धावा