---Advertisement---

दिल्ली काबीज करत टीम इंडियाचा मोठा कारनामा! चालू वर्षात सोडली नाही एकही ट्रॉफी

On: मंगळवार, ऑक्टोबर 11, 2022 7:57 PM
---Advertisement---

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरचा सामना दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. भारताने विजयासाठी मिळालेले 100 धावांचे आव्हान केवळ तीन गडी गमावत पार केले. यासह भारतीय संघाने मालिका 2-1 अशी आपल्या नावे केली. यासह भारतीय संघाने मागील पाच वनडे मालिकांमध्ये अपराजित राहण्याचा कारनामा केला.

मालिकेतील पहिला सामना दक्षिण आफ्रिकेने आपल्या नावे केला होता. त्यानंतर दुसरा सामना जिंकत भारतीय संघाने बरोबरी साधली. या अखेरच्या सामन्यात उभय संघ विजयासाठी शर्थीच प्रयत्न करतील, अशी अपेक्षा सर्वांना होती. मात्र, भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर एकतर्फी विजय मिळवत मालिका खिशात घातली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला या दौऱ्यावर टी20 मालिकेनंतर वनडे मालिकेतही पराभव पत्करावा लागला.

भारतीय संघाने यावर्षी वनडे व टी20 क्रिकेटमध्ये शानदार फॉर्म दाखवला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरूद्ध मायदेशात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली होती. या मालिकेत भारतीय संघाने पाहुण्या संघाला व्हाईट वॉश दिलेला. त्यानंतर जुलै महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर इंग्लंडला 2-1 असे पराभूत करत मालिका खिशात घातली होती. ऑगस्ट महिन्यात वेस्ट इंडिजला त्यांच्याच घरच्या मैदानावर 3-0 अशा फरकाने पराभूत करण्याची कामगिरी भारतीय संघाने केली होती. झिम्बाब्वे दौऱ्यावरही भारताने 3-0 असा विजय साजरा केलेला. त्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेला 2-1 ने पराभूत करत भारताने या वर्षावर आपली छाप सोडली आहे. भारतीय संघ यानंतर आता थेट डिसेंबर महिन्यात श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका खेळेल.

पुढील वर्षी भारतातच वनडे विश्वचषक होत असल्याने भारतीय संघ या मालिकांमध्ये अधिकाधिक खेळाडूंना पारखून घेताना दिसतोय. दक्षिण आफ्रिकेला पराभूत करणाऱ्या संघात प्रमुख खेळाडूंचा समावेश नव्हता.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सिराज-सुंदरनंतर कुलदीप शो! यादवसाठी दुसऱ्या क्रमांकाचा ‘वनडे स्पेशल’ संघ दक्षिण आफ्रिका, पहिल्या…
कार्तिकनंतर ‘हा’ असणार टीम इंडियाचा फिनिशर? संघ व्यवस्थापनाने आताच दिली जबाबदारी
कॅप्टन रोहितचा संघ टी20 वर्ल्डकपनंतर ‘या’ संघाच्या दौऱ्यावर जाणार, पाहा संपूर्ण स्केड्युल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---