भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर रविवारी (२० फेब्रुवारी) टी२० मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना झाला. पाहुण्या वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकत अपेक्षित असा गोलंदाजीचा निर्णय घेतला. परिणामी भारताने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १८४ धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ ९ बाद १६७ धावाच करू शकला. अशाप्रकारे भारताने १७ धावांनी हा सामना जिंकला असून ३-० च्या फरकाने टी२० मालिकाही जिंकली आहे. यापूर्वी यजमानांनी वनडे मालिकेतही पाहुण्यांना व्हाईटवॉश दिली होता.
भारताच्या १८५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना विशेष खेळी करता आल्या नाहीत. यष्टीरक्षक फलंदाज निकोलस पूरनने चिवट झुंज दिली. तो ४७ चेंडूंमध्ये १ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने ६१ धावा करून बाद झाला. परंतु त्याच्याव्यतिरिक्त वेस्ट इंडिजचे इतर फलंदाज विशेष योगदान देऊ शकले नाहीत. रोवमन पॉवेल २५ धावा तर रोमॅरिओ शेफर्ड २९ धावा करू शकले. त्यामुळे वेस्ट इंडिजला विजयाच्या नजीक पोहोचूनही सामना गमवावा लागला.
भारताकडून या डावात हर्षल पटेलने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर दीपक चाहर, शार्दुल ठाकूर आणि वेंकटेश अय्यर यांनीही प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
That's that from the final T20I as #TeamIndia win by 17 runs to complete a 3-0 clean sweep in the series.
Scorecard – https://t.co/2nbPwNh8dw #INDvWI @Paytm pic.twitter.com/u5z5CzD44b
— BCCI (@BCCI) February 20, 2022
India complete a clean sweep 👏
They win the final T20I against West Indies in Kolkata by 17 runs to win the series 3-0 🙌#INDvWI | 📝 https://t.co/v4n2wgfk91 pic.twitter.com/q4OYX5lDAT
— ICC (@ICC) February 20, 2022
तत्पूर्वी पहिल्यांदा फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाने निर्धारित २० षटकांमध्ये ५ गड्यांच्या नुकसानावर १८४ धावा केल्या होत्या. भारताकडून मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव याने ताबडतोब अर्धशतकी खेळी केली. सलामीवीर ऋतुराज गायकवाड (४ धावा) स्वस्तात बाद झाल्यानंतर इशान किशन (३४ धावा) आणि श्रेयस अय्यर (२५ धावा)ने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. परंतु आक्रमक फटकेबाजी करणारे हे फलंदाज मोठ्या खेळी करू शकले नाहीत.
अखेर अष्टपैलू वेंकटेश अय्यरला साथीला घेत सूर्यकुमारने वैयक्तिक ६५ धावा चोपल्या. ३१ चेंडूंचा सामना करताना ७ षटकार आणि एका चौकारासह त्याने ही खेळी केली. तर अय्यरनेही १९ चेंडूंमध्ये ३५ धावांची नाबाद खेळी केली.
या डावात वेस्ट इंडिजकडून जेसन होल्डर, रोमॅरिओ शेफर्ड, रोस्टन चेज, डॉमिनिक ड्रेक्स आणि हेडन वॉल्श यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल २०२२ चे वेळापत्रक जाहीर होण्यास का होतोय विलंब? कारण आले पुढे
हॅप्पी बर्थडे…! वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशा नेगीला रिषभ पंतने स्पेशल फोटो शेअर करत केले विश
पुजाराची धुव्वादार खेळी आणि १०व्या विकेटसाठीची अभेद्य भागीदारी, सौराष्ट्रने मुंबईविरुद्ध टाळला पराभव