---Advertisement---

श्रीलंकेत आपली कामगिरी दाखवण्यासाठी भारतीय संघाचा ‘यंगीस्थान’ सज्ज, वाचा या दौऱ्याबद्दल सर्वकाही

On: शनिवार, जून 12, 2021 1:44 AM
---Advertisement---

गुरुवारी(10 जून) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय ) श्रीलंका दौऱ्यासाठी भारताच्या मर्यादीत षटाकांच्या संघाची घोषणा केली. या दौऱ्यासाठी अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. कारण भारताचे काही अनुभवी खेळाडू भारतीय कसोटी संघासह इंग्लंड दौऱ्यावर गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्व शिखर धवन करणार आहे. तर भुवनेश्वर कुमार उपकर्णधार म्हणून निवडण्यात आले आहे.

भारतीय संघात चेतन साकरिया, ऋतुराज गायकवाड, कृष्णप्पा गौतम, आणि देवदत्त पडिक्कल यांचा समावेश केला आहे. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आणि देशांतर्गत स्पर्धांमध्ये चांगल्या कामगिरी केल्याबद्दल या खेळाडूंना बक्षीस मिळाले आहे.

भारतीय संघ श्रीलंकेत 3 एकदिवसीय आणि 3 टी20 सामने खेळणार आहे.
भारतीय संघ जुलैमध्ये श्रीलंकेत 3 वनडे आणि 3 टी -20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. सर्व सामने कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळले जातील. ईशान किशन आणि संजू सॅमसनच्या रूपात दोन यष्टिरक्षकांचा समावेश आहे. विजय हजारे ट्रॉफी आणि आयपीएल 2021 च्या पहिल्या सत्रात चमकदार कामगिरी करणारा पृथ्वी शॉ देखील संघात स्थान मिळविण्यात यशस्वी झाला आहे.

घरगुती क्रिकेट आणि आयपीएलमधील चांगल्या प्रदर्शनामुळे देवदत्त पडिक्कलला मिळाले बक्षीस

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळणाऱ्या युवा सलामीवीर देवदत्त पडिक्कलने आयपीएलच्या मागील हंगामात 15 सामन्यांमध्ये 473 धावांसोबत आपले नाव गाजवले होते. देवदत्त हा आरसीबीकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. या डाव्या हाताच्या फलंदाजाने त्याच्या पदार्पण मोसमात पाच अर्धशतके झळकावली होती. तसेच यावर्षाच्या सुरुवातीला झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीमध्येही त्याने उत्तम कामगिरी दाखवली. त्याने मुश्ताक अली ट्रॉफीच्या 6 सामन्यात 218 धावा आणि विजय हजारे येथे 7 सामन्यांत 737 धावा केल्या. आयपीएल 2021 च्या पहिल्या सत्रात त्याने 6 सामन्यांत 195 धावा केल्या, त्यात राजस्थान रॉयल्सविरूद्ध नाबाद 101 धावांचा समावेश होता.

नितीश राणा केकेआरचा टॉप परफॉर्मर 
27 वर्षीय नितीश राणाने 2016 साली मुंबई इंडियन्सकडून (एमआय) आयपीएलमध्ये प्रवेश केला होता. नितीशने मुंबईकडून दोन आयपीएलचे मोसम खेळले आहेत. त्यानंतर 2018 मध्ये तो कोलकाता नाईट रायडर्समध्ये गेला. नितीशने आतापर्यंत 60 आयपीएल सामन्यांमध्ये 11 अर्धशतकांसह 1437 धावा केल्या आहेत. आयपीएल 2021 च्या पहिल्या सत्रात राणा केकेआरचा टॉप परफॉर्मर होता. त्याने 7 सामन्यात 201 धावा केल्या.

चेतन साकारिया आयपीएलमध्ये पदार्पण करताच वर्चस्व गाजवले
वेगवान गोलंदाज चेतन साकारियाला आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली. या नवोदित गोलंदाजने येताच या टी20 लीगवर वर्चस्व गाजवले. 23 वर्षाचा डावखुरा वेगवान गोलंदाज चेतन साकारिया हा सौराष्ट्रकडून घरगुती क्रिकेट खेळत आहे. चेतन साकारियाने आयपीएल 2021 च्या पहिल्या सत्रात 7 विकेट्स घेतल्या आहे. त्याने राजस्थान रॉयल्सच्या सहकारी गोलंदाज ख्रिस मॉरिस, जयदेव उनाडकट आणि मुस्तफिजुर रहमान यांना उत्कृष्ट साथही दिली.

ऋतुराज गायकवाडने आयपीएल 2020 मध्ये सलग 3 अर्धशतक ठोकले होते.
आयपीएल 2020 मध्ये लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून शेवटच्या तीन सामन्यात सलामीवीर ऋतुराज गायकवाडने सलग अर्धशतके झळकावून आपली कामगिरी सिद्ध केली. गायकवाडने 6 सामन्यात 3 अर्धशतकांसह 204 धावा केल्या होत्या. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळलेल्या ऋतुराज गायकवाडचे कर्णधार महेंद्रसिंग धोनीनीही कौतुक केले आहे. ऋतुराज गायकवाडने आयपीएल २०२१च्या पहिल्या सत्रात देखील चांगली कामगिरी केली आहे.

श्रीलंकेच्या फिरकीपटूंसाठी उत्तम खेळपट्ट्यांवर कृष्णप्पा गौतम यशस्वी होऊ शकतो.
अष्टपैलू क्रिकेटपटू कृष्णाप्पा गौतम आयपीएलच्या लिलावातील अनकॅप्ड भारतीयांमधील सर्वात महागडा खेळाडू आहे. कर्नाटकच्या या अष्टपैलू खेळाडूने 42 प्रथम श्रेणी सामन्यात 1045 धावा आपल्या नावावर केल्या आहेत. याशिवाय त्याने गोलंदाजीत आश्चर्यकारक कामगिरी करत 166 बळीही घेतले आहेत. आयपीएल 2021 मध्ये गौतमला चेन्नई सुपर किंग्जकडून आपली कामगिरी दाखविण्याची संधी मिळाली नाही. पण श्रीलंकेच्या फिरकीपटूनसाठी उत्तम अश्या खेळपट्ट्यांवर कृष्णाप्पा गौतम आपल्या गोलंदाजीमुळे विरोधी फलंदाजांना त्रास देऊ शकतो.

पहिला वनडे 13 जुलै रोजी खेळला जाईल
भारतीय संघ श्रीलंका दौर्‍यावर 13,16 आणि 18 जुलै रोजी तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. यानंतर 21, 23 आणि 25 जुलै रोजी टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले जातील.

श्रीलंका दौर्‍यासाठी भारतीय संघ खालीलप्रमाणे आहे.
शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिकल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीश राणा, ईशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, राहुल चहर, कृष्णाप्पा गौतम, कृणाल पंड्या , कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन साकारिया.

नेट गोलंदाज: ईशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंग, सई किशोर, सिमरजित सिंह.

महत्वाच्या बातम्या

नशीबात नव्हतं पण मिळालं! श्रीलंका दौऱ्यावर निवडीसाठी हक्कदार नव्हते ‘हे’ ५ खेळाडू; तरीही मिळाले स्थान

‘घरी नको जायला, खूप मार पडेल’; युवीने सांगितला २००७ विश्वचषकानंतरचा तो किस्सा

धोनीसोबतच्या मैत्रीमुळे भारतीय संघात देण्यात येत होती जागा? सुरेश रैनाने दिले ‘हे’ उत्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---