अॅडलेड। गुरुवार(6 डिसेंबर) पासून भारताची आॅस्ट्रेलिया विरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 6-10 डिसेंबरपासून अॅडलेड ओव्हल मैदानावर होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 5.30 वाजता सुरुवात होणार आहे.
या सामन्यासाठी आज(5 डिसेंबर) बीसीसीआयने अंतिम 12 जणांच्या भारतीय संघाची घोषणा केली आहे.
या अंतिम 12 जणांच्या संघात कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार अजिंक्य रहाणे, केएल राहुल, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, हनुमा विहारी, यष्टीरक्षक रिषभ पंत, आर अश्विन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह यांना संधी मिळाली आहे.
या 12 जणांमधून पहिल्या सामन्याच्याआधी नाणेफेकीवेळी अंतिम 11 जणांची नावे जाहिर होतील.
या 12 जणांमध्ये पार्थिव पटेल, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, उमेश यादव आणि भुवनेश्वर कुमार यांना संधी मिळालेली नाही.
पहिल्या कसोटीसाठी अशी आहे १२ सदस्यीय टीम इंडिया-
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएल राहुल, एम विजय, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, एम शमी , इशांत शर्मा, जसप्रीत बुमरा #म #मराठी #indvaus #AusvInd #ViratKohli @marathirt— Maha Sports (@Maha_Sports) December 5, 2018
महत्त्वाच्या बातम्या:
–हॉकी विश्वचषक २०१८: तीनवेळच्या विश्वविजेत्या नेदरलँडचे आव्हान पेलण्यास जर्मनी सज्ज
–रमेश पोवारांना पाठिंबा देणाऱ्या हरमनप्रीत कौरवर संजय मांजरेकरांची कडक शब्दात टीका
–२०११ विश्वचषकाचा हिरो गौतम गंभीरची क्रिकेटमधून निवृत्ती