पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताचा तिरंगा डाैलात फटकत आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंंची कामगिरी दिवसापरी खूप चांगले होत आहे. स्पर्धेतील आतापर्यंत पूर्ण झालेल्या 7 दिवसांत भारताच्या खात्यात एकूण 24 पदके जमा झाली आहेत. आज (05 सप्टेंबर) म्हणजेच 8 व्या दिवशी भारताला 8 पदके मिळण्याची अपेक्षा आहे. आज भारत पदकतालिकेत 30चा टप्पा ओलांडू शकतो. सध्या भारत 24 पदकांसह पदकतालिकेत 13व्या स्थानावर आहे. चला तर मग या बातमीद्वारे जाणून घेऊयात पॅरिस पॅरालिम्पिकमधील भारताचे आजचे वेळापत्रक.
भारताच्या खात्यात आतापर्यंत 24 पदकांमध्ये 5 सुवर्ण, 9 रौप्य आणि 10 कांस्य पदकांचा समावेश आहे. आज पॅरा नेमबाजी, पॅरा आर्चरी, ब्लाइंड ज्युडो, ॲथलेटिक्स अशा खेळांमधून पदकांची अपेक्षा केली जाऊ शकते. काही भारतीय खेळाडूंना पदकांसाठी पात्र ठरावे लागेल किंवा अंतिम सामना खेळावा लागेल. तर अनेक भारतीय खेळाडू अंतिम सामन्यासाठी मैदानात उतरतील.
पॅरा पॉवरलिफ्टिंग पुरुषांची 65 किलो गटाची अंतिम फेरी अशोक मैदानात असणार आहे. त्याच्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. याशिवाय अरविंद पॅरा ॲथलेटिक्समध्ये पुरुषांच्या शॉटपुट F35 च्या अंतिम फेरीत भाग घेणार आहे. अरविंदकडूनही सुवर्णपदकाची अपेक्षा असेल.
पॅरिस पॅपालिम्पिकच्या सहाव्या दिवशीच भारताने टोकियो पॅरालिम्पिकचा विक्रम मोडला होता. सहाव्या दिवशी भारताच्या खात्यात 20 जमा झाली होती. मागील टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने एकूण 19 पदके जिंकली होती. आता 7 दिवस पूर्ण झाल्यानंतर भारताच्या खात्यात एकूण 24 पदके जमा झाली आहेत.
पॅरिस पॅरालिम्पिकचे भारताचे आजचे (5 सप्टेंबर) वेळापत्रक
शूटिंग
दुपारी 1 वाजता – मिश्र 50 मीटर रायफल प्रोन SH1 पात्रता – सिद्धार्थ बसू आणि मोना अग्रवाल
तिंरदाजी
दुपारी 1:50 वाजता – मिश्र सांघिक रिकर्व ओपन (प्री क्वार्टर फायनल) पूजा आणि हरविंदर सिंग विरुद्ध अमांडा जेनिंग्ज आणि टॅमन केंटन-स्मिथ (ऑस्ट्रेलिया)
ज्युडो
दुपारी 1:30 वाजता – महिला 48 किलो उपांत्यपूर्व फेरी – कोकिला विरुद्ध अकमारल नौटबेक (कझाकिस्तान)
दुपारी 1:30 वाजता – पुरुष 60 किलो उपांत्यपूर्व फेरी – कपिल परमार विरुद्ध मार्कोस ब्लँको (व्हेनेझुएला)
पॉवरलिफ्टिंग
रात्री 10 वाजता – पुरुष 65 किलो अंतिम फेरी – अशोक
हेही वाचा-
6 षटकात 113 धावा; कांगारुंचा विश्वविक्रम, ट्रॅव्हिस हेडची वादळी खेळी
दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या फेरीतून तीन खेळाडू बाहेर; BCCI ने केली बदलीची घोषणा
Paralympics 2024; क्लब थ्रोमध्ये भारताचा दुहेरी धमाका; एकाच स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्यची कमाई