---Advertisement---

द्रविडची उदारता तुम्हालाही भावेल! भारतीय खेळाडूंचे जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहून थोपटली फिल्डिंग कोचची पाठ

On: सोमवार, नोव्हेंबर 22, 2021 12:07 AM
---Advertisement---

न्यूझीलंडचा संघ सध्या भारतीय दौऱ्यावर असून नुकतीच उभय संघांमध्ये ३ सामन्यांची टी२० मालिका पार पडली आहे. या संपूर्ण टी२० मालिकेत भारतीय संघाने प्रशंसनीय प्रदर्शन करत पाहुण्या न्यूझीलंडला क्लिन स्वीप केले आहे. त्यातही तिसऱ्या आणि अंतिम टी२० सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडवर ७३ धावांनी सोपा विजय मिळवला आहे.

कोलकाता येथे झालेल्या या सामन्यात भारतीय खेळाडूंनी फलंदाजी, गोलंदाजीसहित क्षेत्ररक्षणातही दमदार प्रदर्शन करत न्यूझीलंडपुढील अडचणी वाढवल्या होत्या. या सामन्यातील भारतीय खेळाडूंचे क्षेत्ररक्षण पाहून संघ प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आपले सहकारी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक यांनी पाठ थोपटली आहे.

त्याचे झाले असे की, तिसऱ्या टी२० सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी निवडत २० षटकअखेर १८४ धावा कुटल्या होत्या. कर्णधार रोहित शर्मा याची ५६ धावांची खेळी आणि शेवटी दिपक चाहरची नाबाद २१ धावांची झंझावाती खेळी, यांच्या जोरावर भारतीय संघाने हा धावांचा डोंगर उभा केला होता. फलंदाजीनंतर न्यूझीलंडच्या डावादरम्यान भारतीय गोलंदाजांनीही अप्रतिम खेळ दाखवला.

गोलंदाजांच्या योगदानामुळेच भारतीय संघ १८ षटकांमध्येच न्यूझीलंडला केवळ १११ धावांवर रोखण्यात यशस्वी ठरला. यादरम्यान क्षेत्ररक्षकांनीही मोलाचे सहकार्य केल्यामुळे संघाला पटापट विकेट्स मिळू शकल्या. त्यातही १२ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर न्यूझीलंडच्या कर्णधार मिचेल सँटनरला धावबाद करण्यासाठी इशान किशनने फेकलेला अचूक थ्रो सामन्याचे आकर्षण ठरला.

https://twitter.com/ygee02/status/1462463964034441218?s=20

भारतीय खेळाडूंची क्षेत्ररक्षणातील अशी कामगिरी पाहून सामना पाहात असलेले मुख्य प्रशिक्षक द्रविड भलतेच खुश झाले. यावेळी त्यांनी आपल्या बाजूलाच बसलेल्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलिप यांची पाठ थोपटवत त्यांच्या परिश्रमांचे कौतुक केले. त्यांचे हे दृश्य कॅमेरात कैद झाले असून याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. अनेकांनी द्रविड यांना आपल्या संघसहकाऱ्याचे कौतुक करताना पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

 महत्त्वाच्या बातम्या-

रोहित-ईडन गार्डन्सचे ‘अजोड’ नाते तुफानी अर्धशतकाने झाले आणखीन वृद्धिंगत

‘हिटमॅन’चं विश्वविक्रमी अर्धशतक! विराटला मागे टाकत ‘या’ यादीत रोहित पहिल्या क्रमांकावर विराजमान

माईलस्टोन अलर्ट! भारताच्या युझवेंद्र चहलसाठी कोलकाता टी२० राहिली विक्रमी, केला ‘हा’ खास किर्तीमान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---