---Advertisement---

सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा दणदणीत विजय, पाकिस्तानला मोठा फटका बसण्याची शक्यता!

On: बुधवार, मार्च 5, 2025 4:05 PM
---Advertisement---

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सुरू होण्यापूर्वीच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढाई सुरू झाली होती. अखेर भारतीय संघासाठी हायब्रिड मॉडेल स्वीकारण्यात आले ज्यामुळे भारतीय संघाचे सर्व सामने दुबईमध्ये खेळवण्यात आले. वेळापत्रकानुसार 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना लाहोरमध्ये खेळवला जाणार होता, परंतु भारत अंतिम फेरीत जाणार असल्याने अंतिम सामन्याचे ठिकाण लाहोरवरून दुबई करण्यात आले आहे. या बदलामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.

वृत्तसंस्था पीटीआयनुसार आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी एकूण 586 कोटी रुपयांचे बजेट मंजूर केले होते. स्पर्धेत एकूण 15 सामने खेळवले जाणार होते आणि प्रत्येक सामन्यासाठी सुमारे 29 कोटी रुपयांचे बजेट ठेवण्यात आले होते. आतापर्यंत भारताचे सेमीफायनलसह 4 सामने दुबईमध्ये खेळले गेले आहे मूळ वेळापत्रकानुसार हे चार सामने पाकिस्तानमध्ये खेळवले जाणार होते. भारतीय संघाच्या चार सामन्यांमुळे पीसीबीला आतापर्यंत 156 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. भारत अंतिम फेरीत गेल्यापासून ते दुबईमध्ये खेळवले जाईल. यामुळे पाकिस्तानची एकूण तूट 195 कोटी रुपयांपर्यंत जाणार आहे.

याआधी पाकिस्तानमध्ये मैदानांचे नूतनीकरण करण्यात आले होते. रावळपिंडी, कराची आणि लाहोरच्या मैदानांच्या नूतनीकरणासाठी प्रत्येकी 500 कोटी रुपये खर्च करण्याची योजना आखण्यात आली होती. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पीसीबीला अपेक्षा होती की मैदान प्रेक्षकांनी भरलेले असेल, परंतु प्रेक्षकांची संख्या अपेक्षेपेक्षा खूपच कमी होती. पाकिस्तान संघ गट टप्प्यातून बाहेर पडल्याने आणि 2 सामने पावसामुळे वाया गेल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली. रावळपिंडीच्या मैदानावर नाणेफेक न करता रद्द केलेल्या सामन्यांसाठी पीसीबीला तिकिटांचे पैसेही परत करावे लागले आहेत.

 

महत्वाच्या बातम्या : 

वरुण चक्रवर्तीचा आयसीसी रँकिंगमध्ये दणदणीत प्रवेश, 143 स्थानांची झेप घेत थेट या स्थानावर!

सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून श्रेयस अय्यरचा सन्मान, ड्रेसिंग रूममध्ये रवी शास्त्रींनी दिले पदक

आयसीसी क्रमवारीत विराटची मोठी झेप, शुबमन गिल अव्वल स्थानी कायम, पण हिटमॅनला फटका

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---