---Advertisement---

चहलच्या होणाऱ्या पत्नीने केला ‘दारू बदनाम’ गाण्यावर धमाकेदार डान्स; व्हिडिओ झाला व्हायरल

On: मंगळवार, ऑगस्ट 18, 2020 2:32 PM
---Advertisement---

नवी दिल्‍ली। भारतीय संघाचा स्टार गोलंदाज युझवेंद्र चहल एकीकडे १९ सप्टेंबरपासून यूएईत सुरू होणाऱ्या आयपीएल स्पर्धेच्या तयारीत मग्न असल्यामुळे सोशल मीडियावर सक्रिय नाही. परंतु त्याची होणारी पत्नी धनश्री वर्मा सोशल मीडियावर आपल्या पोस्टमुळे चर्चेचा विषय ठरत आहे. तिने आपला धमाकेदार डान्स व्हिडिओ शेअर केला असून त्याला अधिक पसंती मिळत आहे.

धनश्रीने ‘दारू बदनाम’ या गाण्यावर डान्स केला आहे. तिने शेअर केलेला हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओ शेअर करत तिने लिहिले की, “हा माझा आवडता आहे. मी हा थ्रोबॅक व्हिडिओ शेअर करण्याची खूप वाट पाहत होते.”

https://www.instagram.com/p/CD8oFAzlsU1/?utm_source=ig_web_copy_link

८ ऑगस्टला चहलने आपल्या रोका या समारंभाचे फोटो शेअर करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. या समारंभानंतर हे जोडपं मुंबई विमानतळावर पहिल्यांदाच एकत्र दिसले होते. खरं तर धनश्री चहलला सोडण्यासाठी विमानतळावर आली होती.

धनश्री ही व्यावसायिकरीत्या डॉक्टर आहे. परंतु तिने कोरिओग्राफर म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---