विराट कोहलीची गणना जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये केली जाते. गेल्या दशकात कोहलीने क्रिकेटमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. जोपर्यंत कोहली क्रीजवर आहे. तोपर्यंत टीम इंडिया हा सामना जिंकू शकते. अशी आशा चाहत्यांना आहे. तो मायदेशात खेळत असो किंवा परदेशात. त्याने प्रत्येक परिस्थितीत टीम इंडियासाठी धावा केल्या आहेत. त्याच्याकडे उत्कृष्ट तंत्र आणि फलंदाजीचे कौशल्य आहे. एकदा तो क्रीजवर आला की तो मोठी खेळी खेळण्यासाठी ओळखला जातो. परंतु अलीकडच्या काही काळापासून हे दिसायला मिळत नाहीये.
या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये विराट कोहली आपल्या नावाप्रमाणे कामगिरी करू शकलेला नाही. गेल्या 8 कसोटी डावांमध्ये कोहलीच्या नावावर केवळ एक अर्धशतक आहे. त्याच्यासारख्या मोठ्या खेळाडूकडून चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. त्याने 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 18 सामने खेळला असून एकूण 483 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 21.95 आहे. कोहलीची त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत कोणत्याही वर्षात इतकी कमी सरासरी झालेली नाही. खराब फलंदाजीमुळेच तो या स्थानावर पोहोचला आहे. पण 2024 हे वर्ष अजून संपलेले नाही. येत्या सामन्यांमध्ये जर त्याने चांगली कामगिरी केली तर त्याची सरासरी थोडी वाढण्याची शक्यता आहे. याआधी 2008 मध्ये त्याची सर्वात वाईट सरासरी होती. त्यानंतर त्याने एकूण 5 सामने खेळले आणि 159 धावा केल्या आणि त्याची सरासरी 31.80 होती. कोहलीने 2008 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
विराट कोहलीची वार्षिक सरासरी:
वर्ष 2008- 31.80
वर्ष 2009- 54.16
वर्ष 2010- 48.61
वर्ष 2011- 39.14
वर्ष 2012- 53.31
वर्ष 2013- 53.13
वर्ष 2014- 55.75
वर्ष 2015- 38.44
वर्ष 2016- 86.50
वर्ष 2017- 68.73
वर्ष 2018- 68.37
वर्ष 2019- 64.60
वर्ष 2020- 36.60
वर्ष 2021- 37.07
वर्ष 2022- 38.51
वर्ष 2023- 66.06
वर्ष 2024- 21.95
तिन्ही फॉरमॅटमध्ये 100 हून अधिक सामने खेळणारा विराट कोहली हा भारताचा एकमेव खेळाडू आहे. 2024 चा टी20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा तो सदस्य होता. त्यानंतर त्याने टी20 आंतरराष्ट्रीय मधून निवृत्ती घेतली. सध्या त्याचे लक्ष पूर्णपणे कसोटी आणि वनडेवर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरनंतर सर्वाधिक शतके करणारा तो दुसरा खेळाडू आहे. त्याच्या नावावर 80 शतकांची नोंद आहे.
विराट कोहलीने 117 कसोटी सामन्यात 9035 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने 295 एकदिवसीय सामन्यांमध्ये 13906 धावा आणि 125 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 4188 धावा केल्या आहेत. सचिन तेंडुलकरच्या हिमालयासारखा विक्रम कोणता खेळाडू गाठू शकला असेल तर तो कोहली आहे.
हेही वाचा-
“भारतीय संघ आपल्याच जाळ्यात अडकला”, पुणे कसोटीतील पराभवानंतर दिग्गजाच्या टीम मॅनेजमेंटला कानपिचक्या
फिरकींसमोर टीम इंडिया नतमस्तक, स्पीन खेळण्यात भारत बांग्लादेशपेक्षाही मागे; पाहा आकडेवारी
“जसप्रीत बुमराहला तिसऱ्या कसोटीतून वगळण्यात यावं”, माजी भारतीय खेळाडूचा सल्ला