यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीचा फायनल सामना भारत आणि न्यूझीलंड संघात खेळला गेला. त्यामध्ये भारतीय संघाने शानदार मिळवला आणि चॅम्पियन्स ट्राॅफीवर आपले नाव कोरले. दरम्यान भारतीय क्रिकेट संघाने आयसीसीच्या विविध स्पर्धांमध्ये अनेकदा विजय मिळवला आहे. या विजयांनी भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सोनेरी पाने जोडली आहेत. तत्पूर्वी भारतीय संघाने आतापर्यंत जिंकलेल्या आयसीसी स्पर्धांच्या विजेतेपदांबद्दल आपण जाणून घेऊया.
1) आयसीसी वनडे विश्वचषक- भारतीय संघाने कपिल देव (Kapil Dev) यांच्या नेतृत्वाखाली पहिला विश्वचषक जिंकला होता. यावेळी संघाने फायनल सामन्यात दिग्गज वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवला होता. त्यानंतर 2011 मध्ये भारतीय संघाने महेंद्रसिंग धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) नेतृत्वाखाली भारताने दुसरा वनडे विश्वचषक जिंकला. फायनल सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव केला.
2) आयसीसी टी20 विश्वचषक- भारताने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली 2007 साली पहिला टी20 विश्वचषक जिंकला. फायनल सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. एमएस धोनीनंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करत 2024च्या टी20 विश्वचषकावर आपले नाव कोरले. दरम्यान भारताने दक्षिण आफ्रिकेचा फायनलमध्ये धुव्वा उडवून दुसरा टी20 विश्वचषक जिंकला.
3) आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी- 2002ला सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारताने श्रीलंकेसोबत संयुक्त विजेतेपद पटकावले होते. कारण फायनल सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यानंतर 2013ला महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने दुसरी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. यावेळी संघाने फायनल सामन्यात इंग्लंडला धूळ चारली होती. आता 2025ला भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली फायनलमध्ये न्यूझीलंडचा पराभव करत चॅम्पियन्स ट्राॅफीवर आपले नाव कोरले.
आयसीसी स्पर्धांमध्ये भारतीय संघाची विजेतेपदं (कर्णधार)-
1983 वनडे विश्वचषक (कपिल देव)
2002 चॅम्पियन्स ट्राॅफी (सौरव गांगुली) (श्रीलंकेसोबत संयुक्त विजेतेपद)
2007 टी20 विश्वचषक (एमएस धोनी)
2011 वनडे विश्वचषक (एमएस धोनी)
2013 चॅम्पियन्स ट्रॉफी (एमएस धोनी)
2024 टी20 विश्वचषक (रोहित शर्मा)
2025 चॅम्पियन्स ट्राॅफी (रोहित शर्मा)
महत्त्वाच्या बातम्या-
Champions Trophy: श्रेयस अय्यरकडे दुर्लक्ष? न्यूझीलंडचा हा खेळाडू ठरला मालिकावीर!
चॅम्पियन्स ट्रॉफीची ट्रॉफी भारताच्या हाती; २५ वर्षांनंतर न्यूझीलंडला चाखवली पराभवाची चव
हिटमॅन’चा धमाका; आयसीसी स्पर्धेत पहिले अर्धशतक