---Advertisement---

मोठी घोषणा: रणजी ट्रॉफी स्पर्धेला उद्यापासून सुरुवात, अशी आहे 16 सदस्यीय टीम महाराष्ट्र

On: गुरूवार, जानेवारी 4, 2024 12:20 PM
Maharashtra-Ranji-Team
---Advertisement---

Ranji Trophy 2024: अतिशय प्रतिष्ठेच्या अशा रणजी ट्रॉफी स्पर्धेला 5 जानेवारी 2024 पासून सुरुवात होत आहे. यावेळी 38 संघ स्पर्धेत सहभागी होत आहेत. स्पर्धेचा हा 89वा हंगाम असून सगळेच संघ विजेतेपदासाठी सज्ज झाले आहेत. महाराष्ट्र संघाची या स्पर्धेसाठी बुधवारी घोषणा करण्यात आली. या हंगामासाठी अनुभवी केदार जाधव याच्याकडे महाराष्ट्र संघाचे नेतृत्त्व देण्यात आले आहे. महाराष्ट्र क्रिकेट संघ यावेळी विजेतेपदासाठी कसोशीने प्रयत्न करताना दिसेल.

या स्पर्धेसाठी महाराष्ट्राने 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. त्यात केदार जाधव, अंकित बावणे, अझिम काझी, निखील नाईक, नौशाद शेख या सिनीयर खेळाडूंचा समावेश आहे. निखील नाईक आणि विशांत मोरे यांच्यावर यष्टीरक्षणाची जबाबदारी असेल. तर फलंदाजीची धुरा केदार जाधव, अंकित बावणे, सिद्धेश वीर, अझिम काझी, धनराज शिंदे, आशय पालकर व निखील नाईक यांच्यावर असेल. फिरकीपटूंमध्ये हितेश वाळुंज, प्रशांत सोलंकी, विकी ओस्तवाल यांच्यावर असेल तर वेगवान गोलंदाजाची धुरा प्रदिप दाधे, रामकृष्ण घोष आणि ओम भोसले यांच्यावर असेल.

साखळी फेरीत महाराष्ट्राचे 7 सामने

यावेळी महाराष्ट्र संघाचे राज्यात 4 सामने होणार असून त्यातील पहिला सामना सोलापूरला होणार आहे तर उरलेले 3 सामने एमसीए स्टेडियम गहुंजे (पुणे) इथे होणार आहेत. सर्व सामन्यांसाठी प्रेक्षकांना प्रवेश मोफत दिला जाणार आहे. तसेच टीम महाराष्ट्राबाहेर हरियाणातील लाहली येथे, राजस्थानमधील जोधपुर येथे आणि दिल्ली येथे सामने खेळणार आहे. साखळी फेरीत संघ एकूण 8 सामने खेळेल. (Kedar to lead as Maharashtra announce squad for Ranji Trophy 2024)

महाराष्ट्राचा रणजी स्पर्धेतील इतिहास-

महाराष्ट्र संघाने 1939-40 आणि 1940-41 अशा सलग दोन हंगामात रणजी स्पर्धेचे विजेतेपद जिंकले होते. तेव्हा संघाचे कर्णधार डीबी देवधर (DB Devdhar) हे होते. तसेच महाराष्ट्र संघ 3 वेळा उपविजेता ठरला आहे. 1970-71, 1992-93, आणि 2013-14 अशा हंगामात संघाला रणजी ट्रॉफी उप-विजेतेपदावर समाधान मानावे लागले. 2013-14साली रोहित मोटवानी (Rohit Motvani) याच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्र शेवटचा रणजी फायनल खेळला होता. त्यानंतर आजपर्यंत संघाला अपेक्षीत कामगिरी करता आली नाही.

सोलापूरचा सामना खास
तब्बल 29 वर्षांनी सोलापूरात रणजी स्पर्धेचा सामना होत आहे. इथल्या इंदिरा गांधी स्टेडियमवर हा सामना होत आहे. यावेळी मणिपुर संघ महाराष्ट्राशी दोन हात करेल. त्यामुळे चाहत्यांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

स्पर्धेचा फॉरमॅट कसा?
यावेळी 38 संघ स्पर्धेत भाग घेणार आहेत. यात 38 संघ एलिट व प्लेट अशा दोन गटांत विभागण्यात आले आहे. त्यात एलिट गटात एकूण 32 संघ असून त्यात A,B,C आणि D असे सबग्रुप करण्यात आले आहेत. तर प्लेट ग्रुपमध्ये 6 संघ असणार आहेत.

महाराष्ट्र संघाचे रणजीच्या 2024 हंगामाचे सर्व वेळापत्रक:
पहीला सामना: 5 जानेवारी 2024, महाराष्ट्र विरुद्ध मणिपूर, इंदिरा गांधी स्टेडिअम, सोलापुर
दुसरा सामना: 12 जानेवारी 2024, महाराष्ट्र विरुद्ध झारखंड, एमसीेए स्टेडिअम, पुणे
तिसरा सामना: 19 जानेवारी 2024, महाराष्ट्र विरुद्ध राजस्थान, बाराकुला खान स्टेडिअम, जोधपुर
चौथा सामना: 26 जानेवारी 2024, महाराष्ट्र विरुद्ध हरयाणा, चौधरी बन्सिलाल क्रिकेट स्टेडिअम, लाहली, हरियाणा
पाचवा सामना: 2 फेब्रुवारी 2024, महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र, एमसीेए स्टेडिअम, पुणे
सहावा सामना: 9 फेब्रुवारी 2024, महाराष्ट्र विरुद्ध विदर्भ, एमसीेए स्टेडिअम, पुणे
सातवा सामना: 16 फेब्रुवारी 2024, महाराष्ट्र विरुद्ध सर्विसेस, एअरफोर्स कॉंप्लेक्स ग्राउंड, नवी दिल्ली

हेही वाचा

IND vs SA: केपटाऊन कसोटीबाबत दक्षिण आफ्रिका कर्णधाराचे लक्षवेधी विधान, म्हणाला, ‘आम्ही या विकेटवर 100 धावाही…’
IND vs SA: सिराजची घातक गोलंदाजी पाहून सूर्यकुमार झाला भलताच खूश, इन्स्टा स्टोरी शेअर करत दिलं खास कॅप्शन 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---