भारतीय संघाने २०११ साली जिंकलेल्या वनडे वर्ल्डकपला आज बरोब्बर १० वर्ष पूर्ण झाली. मायदेशात म्हणजेच भारतात झालेला हा वर्ल्डकप जिंकत भारतीय संघाने इतिहास रचला होता. तब्बल २८ वर्षांनी वनडे वर्ल्डकपचे विजेतेपद भारतीय संघाने पटकावले होते.
या विजयात कर्णधार धोनीचा मोलाचा वाटा होता. त्याने संपूर्ण वर्ल्डकप मध्ये संघाचे कुशलतेने नेतृत्व तर केलेच होते. शिवाय अंतिम सामन्यात नाबाद ९१ धावांची निर्णायक खेळी करत भारताला वर्ल्डकप मिळवून दिला होता. मात्र वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यानंतरच्या धोनीच्या एका कृतीने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते.
अंतिम सामन्यानंतर केले होते मुंडण
भारतीय संघाने वर्ल्डकपचा अंतिम सामना जिंकल्याच्या दुसर्या दिवशी धोनीचे एक निराळेच रूप सगळ्यांसमोर आले होते. सामन्याच्या दुसर्या दिवशी धोनीने आपल्या केसांचे मुंडण केल्याचे दिसून आले होते. अनेकांना यामागील कारणाचा उलगडा झाला नव्हता. मात्र त्यावेळचे टीम मॅनेजर असलेले रंजीव बिस्वाल यांनी यामागील कारणाचा खुलासा केला आहे.
खास कारणाने केले होते धोनीने मुंडण
रंजीव बिस्वाल यांनी यामागील कारणाचा खुलासा करतांना त्यावेळचा घटनाक्रम उलगडला. ते म्हणाले, “वर्ल्डकपचा अंतिम सामना जिंकल्यानंतर आम्ही सगळ्यांनी पहाटे ४.३० पर्यंत जल्लोष केला. त्यानंतर विश्रांती घेऊन खेळाडू पुन्हा भेटले तेव्हा धोनीने मुंडण केल्याचे आम्हाला दिसले होते. हे पाहून आम्ही सगळेच आश्चर्यचकित झालो होतो.”
मात्र त्यानंतर धोनीच्या या कृतीमागील कारणाचा खुलासा झाला होता. त्याचे झाले असे होते की वर्ल्डकप आधी धोनीने रांची येथील त्याच्या घराजवळील एका मंदिरात प्रार्थना केली होती. आणि तेथील पुजाऱ्यांनी त्याला वर्ल्डकप जिंकल्यावर पहाटे पावणे तीन ते तीनच्या दरम्यान मुंडण करण्यास सांगितले होते. म्हणूनच धोनीने ही कृती केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
महाकठीण! आयपीएलमधील धोनी-कोहलीने केलेले ‘हे’ विक्रम रोहितलाही मोडणे आहे केवळ अशक्य
मानलं तुम्हाला! आयपीएलमध्ये एकही शतक न करता ‘या’ तीन दिग्गजांनी ठोकल्यात चार हजार धावा
आयपीएलमध्ये षटकार म्हटलं की रोहित-विराट नाही, तर ‘हे’ तीघे फलंदाज आहेत सर्वात पुढे