क्रिकेटविश्वातील बलाढ्य संघ असलेल्या वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया संघात ३ सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. यातील गुरुवारी (२२ जुलै) होणारा दुसरा वनडे सामना आता दुसरा वनडे सामना बार्बाडोस येथील प्रमाणवेळेनुसार शनिवारी (२४ जुलै) सुरू होईल. कारण, हा सामना कोरोना व्हायरसमुळे स्थगित करण्यात आला होता. असे असले, तरीही मालिकेतील तिसरा सामना ठरल्याप्रमाणे सोमवारी (२६ जुलै) खेळला जाईल.
झाले असे की, वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया संघातील दुसरा वनडे सामना अचानक स्थगित करण्यात आला होता. कारण, वेस्ट इंडिजच्या कँपमध्ये कोरोना व्हायरसचा शिरकाव झाला होता. त्यामुळे सावधगिरी म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता. (Team West Indies vs Australia ODI Series Set To Resume On Saturday)
नाणेफेकीनंतर दोन्ही संघांतील सामना झाला होता स्थगित
मजेशील बाब अशी की, दोन्ही संघातील सामना हा शेवटच्या क्षणी स्थगित झाला होता. नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्डने फलंदाजी करण्याचा निर्णयही घेतला होता.
कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर दोन्ही संघांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. यादरम्यान त्यांची अनेकवेळा कोरोना चाचणी करण्यात आली. पूर्णत: सावधगिरी बाळगल्यानंतरच दुसऱ्या वनडे सामन्याचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वेस्ट इंडिज क्रिकेटचे अध्यक्ष म्हणाले की, “केजीस्टन ओव्हलमध्ये सीजी विमा एकदिवसीय मालिका पुन्हा सुरू झाल्याची घोषणा करून आम्हाला आनंद होत आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या बाबतीत पूर्ण सहकार्य केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करू इच्छितो. हे दोन दिवस आमच्यासाठी खूप आव्हानात्मक होते आणि आम्ही गोष्टी चांगल्याप्रकारे व्यवस्थापित केल्या आहेत. प्रत्येकाच्या सुरक्षिततेची काळजी घेतली गेली आहे आणि बरीच खबरदारी घेतली गेली आहे. जेणेकरून ही मालिका अधिक चांगल्या पद्धतीने करता येईल. आम्ही परिस्थितीवर सतत नजर ठेवू आणि त्यानुसार कार्य करू.”
पहिल्या वनडे सामन्याबाबत बोलायचं झालं, तर ऑस्ट्रेलिन संघाने वेस्ट इंडिजला १३३ धावांनी धूळ चारली होती. पावसामुळे सामन्यात प्रत्येकी ४९ षटके टाकण्यात आली होती. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ९ विकेट्स गमावत २५२ धावांचा डोंगर उभा केला होता. यानंतर विजयासाठी वेस्ट इंडिजला २५७ धावांचे आव्हान मिळाले. मात्र, संपूर्ण संघाचा डाव २६.२ षटकात अवघ्या १२३ धावांवरच संपुष्टात आला. अशामध्ये वेस्ट इंडिज संघ पुढील सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करून मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल.
महत्त्वाच्या बातम्या-
-माही नव्या इनिंगला करणार सुरुवात, प्रशिक्षण क्षेत्रात ठेवणार पाऊल; पाकिस्तानातून भविष्यवाणी
-विराट-सचिनच्या तुलेनवर भडकला पाकिस्तानी क्रिकेटर; म्हणे, ‘अशी निरर्थक गोष्ट करणे थांबवा’