राजस्थान रॉयल्स संघाने आयपीएल २०२२मधील क्वालिफायर २ सामन्यात शुक्रवारी (दि. २७ मे) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला ७ विकेट्सने धूळ चारली. या विजयामुळे राजस्थानने आयपीएल २०२२च्या अंतिम सामन्यात दिमाखात प्रवेश केला. तब्बल १४ वर्षांनंतर राजस्थानला अंतिम सामना खेळण्याचे सुख लाभले. यापूर्वी आयपीएलच्या पहिल्या हंगामात २००८मध्ये राजस्थानने अंतिम सामना खेळत ट्रॉफी उंचावली होती. आताही त्यांच्याकडे दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी उंचावण्याची सुवर्णसंधी आहे.
आता रविवारी (दि. २९ मे) आयपीएल २०२२मधील अंतिम सामन्यात भिडणारे २ संघ ठरले आहेत. हा अंतिम सामना राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघात खेळला जाईल. या सामन्यात गुजरात संघाकडे पहिल्याच हंगामात आयपीएल ट्रॉफी उंचावण्याची संधी आहे, तर दुसरीकडे राजस्थानही दुसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद जिंकण्याच्या प्रयत्नात असेल.
आयपीएल २०२२मधील अंतिम सामन्यासाठीचे संघ तर आपल्याला समजलेच. मात्र, यापूर्वी झालेल्या १४ हंगामात अंतिम सामना खेळणारे संघ कोण होते, याबाबत आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. युएई येथे पार पडलेल्या आयपीएल २०२१मधील अंतिम सामना चेन्नई आणि कोलकाता या संघांमध्ये खेळला गेला होता. हा सामना चेन्नईने जिंकला होता. त्याआधी आयपीएल २०२०मधील अंतिम सामना मुंबई आणि दिल्ली संघात, २०१९मधील अंतिम सामना मुंबई आणि चेन्नई संघात, २०१८मधील अंतिम सामना चेन्नई आणि हैदराबाद संघात, २०१७मधील अंतिम सामना पुणे आणि मुंबई संघात, २०१६मधील अंतिम सामना बेंगलोर आणि हैदराबाद संघात, २०१५मधील अंतिम सामना मुंबई आणि चेन्नई संघात खेळला गेला होता.
त्यापूर्वी आयपीएल २०१४मधील अंतिम सामना कोलकाता आणि पंजाब संघात, २०१३मधील अंतिम सामना चेन्नई आणि मुंबई संघात, २०१२मधील अंतिम सामना कोलकाता आणि चेन्नई संघात, २०११मधील अंतिम सामना चेन्नई आणि बेंगलोर संघात, २०१०मधील अंतिम सामना मुंबई आणि चेन्नई संघात, २००९मधील अंतिम सामना डेक्कन आणि बेंगलोर संघात, तर आयपीएल २००८मधील पहिला वहिला अंतिम सामना राजस्थान आणि चेन्नई संघात खेळला गेला होता.
या संघांमध्ये चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाने सर्वाधिक ९ वेळा आयपीएलचा अंतिम सामना खेळला होता.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आरसीबी हारली, पण पाटीदारने मनं जिंकली; ८ वर्षांनंतर पहिल्यांदाच भारतीयाने आयपीएलमध्ये ‘ही’ कमाल केली
VELvsTRL। स्म्रीती मंधानाने घेतला दीप्ती शर्माचा कठीण झेल, पाहून तुम्हीही म्हणाल, ‘लय भारी!’