कोलकाता। शुक्रवारी झालेल्या आयपीएल 2018च्या क्वालिफायर 2 मध्ये सनरायझर्स हैद्राबादने कोलकाता नाईट रायडर्सवर 14 धावांनी विजय मिळवत दुसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला.
त्यामुळे अंतिम सामन्यात त्यांचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे. हैद्राबाद आणि चेन्नई हे दोन संघ यावर्षीच्या आयपीएलमध्ये गुणतालिकेत अनुक्रमे पहिल्या दोन स्थानावर होते. त्यामुळे आता या दोन अव्वल संघांमध्ये आयपीएल 2018 चा अंतिम सामना पाहायला मिळणार आहे.
साखळी फेरीनंतर गुणतालिकेत पहिल्या दोन स्थानावर असणाऱ्या संघांमध्ये अंतिम सामना होण्याची ही आयपीएल इतिहासातील सहावी वेळ आहे.
याआधी 2011, 2013, 2014, 2015 आणि 2017 यावर्षी साखळी फेरीनंतर गुणतालिकेत पहिल्या दोन स्थानावर असणाऱ्या संघांमध्ये अंतिम सामना झाला होता.
विशेष म्हणजे यातील फक्त 2017 व्यतिरिक्त बाकी वर्षी गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी असणाऱ्या संघाने विजेतेपद मिळवले आहे. फक्त 2017 मध्ये गुणतालिकेत अव्वल स्थानी असणाऱ्या मुंबई इंडियन्सने त्यावर्षीचे विजेतेपद मिळवले होते.
या ६ आयपीएल मोसमात गुणतालिकेत पहिल्या दोन स्थानावर असणाऱ्या संघांमध्ये झाला अंतिम सामना:
2011- रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
2013- चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स
2014- किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
2015- चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स
2017- मुंबई इंडियन्स विरुद्ध रायझिंग पुणे सुपरजायंट्स
2018- सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
महत्त्वाच्या बातम्या-
–IPL 2018: हैदराबाद दुसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात
–इतिहास घडणार, भारतीय खेळाडू देशाबाहेरील या लीगमध्ये खेळणार!
–आयपीएलमधील ४ खऱ्या आॅलराउंडरची नावे वाचून तुम्हाला धक्काच बसेल
–टाॅप ५- एकही शतक न करता या दिग्गजांनी केल्या आयपीएलमध्ये ४ हजार धावा