आयपीएल २०२१ स्पर्धेत कडक बायो बबल असताना देखील कोरोनाचा शिरकाव झाल्याचे पाहायला मिळले होते. खेळाडूंना कोरोनाची लागण होऊ लागल्याने ४ मे रोजी बीसीसीआयने बैठक घेत आयपीएल २०२१ स्पर्धा २९ सामन्यांनंतर अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र, २९ मे रोजी झालेल्या बैठकीत बीसीसीआयने आयपीएलचे उर्वरित सामने युएईमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. हे सामने १९ किंवा २० सप्टेंबरनंतर खेळवण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. परंतु इंग्लंडचे खेळाडू या स्पर्धेत खेळताना दिसून येणार नाहीये. तसेच बांगलादेश क्रिकेट बोर्डाने देखील आपले खेळाडू आयपीएल स्पर्धेसाठी उपलब्ध नसतील असे म्हटले आहे.ऑस्ट्रेलियन संघाला सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान ३ ते ४ मालिका खेळायच्या आहेत ,त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडू या स्पर्धेत खेळताना दिसून येण्याची शक्यता फार कमी आहे
आयपीएल २०२१ स्पर्धेत ऑस्ट्रेलियन संघाच्या १८ खेळाडूंनी सहभाग घेतला होता तर इंग्लंडच्या १२ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. अशातच बीसीसीआय येणाऱ्या काही आठवड्यात राष्ट्रीय क्रिकेट बोर्डांशी सोबत खेळाडूंच्या उपस्थितीबाबत चर्चा करणार आहे. तसेच बीसीसीआय, खेळाडूंच्या उपस्थितीबाबत पुढील निर्णय जुलै महिन्यात घेणार आहे. यासोबतच बीसीसीआय फ्रँचायझींना नवीन खेळाडू आपल्या संघात समाविष्ट करण्याची परवानगी देणार असल्याचे म्हटले जात आहे.
हे ४० खेळाडू होऊ शकतात स्पर्धेबाहेर.
राजस्थान रॉयल्स : मुस्तफिजूर रहमान, लियाम लिविंगस्टोन, जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स, जॉस बटलर, अँड्रयू टाय .
पंजाब किंग्स: डेविड मलान, मोइजेस हेनरिक्स, झाय रिचर्डसन, रिले मेरेडिथ, क्रिस जॉर्डन, ख्रिस गेल, निकोलस पूरन, फॅबियन ऍलन
कोलकाता नाइट राइडर्स: शाकिब अल हसन, पॅट कमिन्स, ओएन मॉर्गन, बेन कटिंग, आंद्रे रसल .
चेन्नई सुपर किंग्स: मोईन अली, सॅम करन, जेसन बेहरनडोर्फ, ड्वेन ब्रावो
दिल्ली कॅपिटल्स : स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टोइनिस, ख्रिस वोक्स, टॉम करन, सॅम बिलिंग्स, शिमरन हेटमायर
मुंबई इंडियंस: क्रिस लिन, नाथन कूल्टर नाइल, कायरन पोलार्ड
सनराइजर्स हैदराबाद: डेविड वॉर्नर, जॉनी बेयरस्टो, जेसन रॉय, जेसन होल्डर
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर : ग्लेन मॅक्सवेल , डॅनिअल सॅम्स , एडम झंपा , केन रिचर्डसन
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लंड संघात बेन स्टोक्सच्या अनुपस्थितीत ५१७ कसोटी विकेट्स घेणाऱ्या ब्रॉडला मिळाली मोठी जबाबदारी
बॅटिंगपेक्षा ती जास्त आवडते का? राशिदने टाकली ‘या’ भारतीय फलंदाजाला गुगली






