मुंबई रणजी संघाचा माजी खेळाडू प्रविण तांबे हा एक वेगळ्याच कारणामुळे चर्चेत असतो. ४० पार केल्यानंतर या क्रिकटपटून आयपीएल तसेच रणजी पदार्पण केले होते.
डिसेंबर महिन्यात आयपीएलच्या 13 व्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव पार पडला. यावेळी कोलकाता नाईट रायडर्सने 48 वर्षीय प्रवीण तांबेला 20 लाखांच्या मूळ किंमतीत संघात सामील केले. यामुळे या स्पर्धेत संधी मिळालेला तांबे हा सर्वाधिक जूना खेळा़डू ठरला होता. परंतु बीसीसीआयने त्याला तांत्रिक कारणाने स्पर्धेत खेळण्यास बंदी घातली.
आकाश चोप्राच्या ऑन द राईज या कार्यक्रमात बोलताना प्रविणने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. १२ मिनीटांच्या या व्हिडीओमध्ये प्रविणचा प्रवास कथन करण्यात आला आहे.
आपल्याला आय़पीएलपेक्षा रणजीतील पदार्पण जास्त महत्त्वाचे वाटल्याचे प्रविणने या कार्यक्रमात सांगितले आहे.
“खरं सांगायचं तर मी आयपीएल खेळून खूप काही आनंदी नव्हतो. परंतु जेव्हा मी मुंबईचा तेव्हाचा कर्णधार वसिम जाफरकडून रणजी ट्राॅफीची कॅप स्विकारली तेव्हा मात्र माझ्या डोळ्यात पाणी आले होते. ” असे प्रविण यावेळी म्हणाला.
https://www.instagram.com/p/B96di2Ug1lI/
“मी कधीही मुंबईकडून खेळण्याचे स्वप्न ठेवले नव्हते. परंतु जेव्हा आपण मनापासून क्रिकेट खेळतो तेव्हा नक्कीच आपल्या इच्छा पुर्ण होतात. क्रिकेटने मला सर्वकाही दिले आहे,” असेही प्रविण पुढे म्हणाला.
फिरकीपटू प्रवीण तांबेने 2013 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. 8 ऑक्टोबर 1971 ही प्रविणची जन्मतारिख असून 48 वर्षे 76 दिवस त्याचे सध्याचे वय आहे. तर याच कोलकाता नाइट रायझर्सचे मुख्य प्रशिक्षक ब्रॅंडन मॅक्युलम 38 वर्षांचे आहेत. त्यामुळे खेळाडूचे वय 48 आणि प्रशिक्षक 38 वर्ष असं वेगळंच समीकरण यावेळी पहायला मिळणार आहे. ब्रॅंडन मॅक्युलम हे तांबेपेक्षा तब्बल 10 वर्षांनी लहान आहेत.
2013 पर्यंत तांबे कोणत्याही प्रथम श्रेणी सामन्यात खेळला नव्हता. परंतु 2013 मध्ये राहुल द्रविडची नजर त्याच्यावर पडली आणि द्रविडने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी तांबेची निवड केली.
त्याला 2013मध्ये वयाच्या 41 व्या वर्षी राजस्थान रॉयल्सने आयपीएलमध्ये पहिल्यांदा संधी दिली होती. 3 वर्षे राजस्थानकडून खेळल्यानंतर 2016 मध्ये गुजराज लायन्सने आपल्या संघात घेतले होते. तर 2017 मध्ये त्याला सनरायझर्स हैद्राबाद संघाने 10 लाखात संघात सामील करुन घेतले.
अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्याने वयाच्या 46 व्या वर्षी मुंबईकडून पदार्पण केले. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये 2 रणजी सामने तर 6 अ दर्जाचे सामने खेळले आहेत.
आयपीेएलमध्ये 2014 च्या मोसमात त्याने राजस्थानकडून खेळताना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध हॅट्रिक घेतली होती.
ट्रेंडिंग घडामोडी-
–कुणी घर घेता का घर? शेन वाॅर्न विकतोय घर; किंमतही आहे तशीच
–टीम इंडियाचं कर्णधारपद रोहित- विराटमध्ये वाटून दिलं तर...
–बरोबर १३ वर्षांपुर्वी १२७किलो वजनाच्या क्रिकेटपटूने घेतला होता उथप्पाचा नेत्रदिपक झेल, पहा व्हीडिओ