टेक महिंद्राने पटकावले पुणेरी पलटण बोल कबड्डी इंटर-कॉर्पोरेट कब्बडी स्पर्धेचे विजेते पद

पुणे। पुणेरी पलटण तर्फे, कॉर्पोरेट संस्थामध्ये क्रीडा संस्कृतीचा विकास व्हावा पुण्याच्या दि मिल्स, शेरेटन ग्रँड हॉटेलचा मागे, संगमवाडी येथे इंटर-कॉर्पोरेट कब्बडी स्पर्धा आयोजन करण्यात आले. पुणेरी पलटणने बोल कबड्डी या आयपी अंतर्गत आंतर कॉर्पोरेट कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले. कॉर्पोरेट क्षेत्रातील दहा संघानी या स्पर्धेत भाग घेतला. हे सर्व संघ अशा प्रकारच्या स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी होत असल्याने वातावरणात कमालीचा उत्साह भरला होता.

या स्पर्धेचा अंतिम सामना टेक महिंद्रा आणि फिनआयक्यू यांच्यात खेळला गेला, ज्यात टेक महिंद्रा संघ ४१ – २१ अशा गुण संख्येने विजयी ठरला. फिनआयक्यू संघातून सुरज हा उत्कृष्ट चढाईपटू ठरला व टेक महिंद्रा संघातून दिनकर हा उत्कृष्ट बचावपटू ठरला.

या निमित्ताने इनशुअरकोट स्पोर्टसचे सीईओ कैलाश कांडपाल म्हणाले की ”इनशुअरकोट येथे, खेळाला प्रोत्साहन देणे आणि लोकांना त्यांच्या जीवनशैलीत खेळाचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करणे हे आमचे उद्दीष्ट आहे. आम्ही आंतर कॉर्पोरेट स्पर्धा आयोजित करीत हे सलग दुसरे वर्ष आहे. कबड्डी हा एक स्वदेशी खेळ आहे आणि कॉर्पोरेट तर्फे या खेळाचे स्वागत तसेच स्वीकार होताना पाहून, खूप बरे वाटले. पुणेरी पलटण प्रती दाखविलेल्या प्रेम व समर्थनासाठी आम्ही पुण्याचे आभार मानतो.”

या स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि अधिक अशा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. या प्रसंगी प्रेक्षकांना कब्बडीतील काही रोमांचक क्षण अनुभवता आले आणि ते त्यांचा आवडीच्या संघांना सतत प्रोत्साहित करत होते.

पुणेरी पलटणच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील कब्बडी टॅलेंट समोर येण्यास मदत होणार आहे. उत्साह आणि अतिशय कष्टाने पुणेरी पलटणने आपला प्रवास सुरू केला आहे, विवो प्रो कबड्डी लीगच्या सातव्या पर्वात पुणेरी पलटणने उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. टीम आपल्या शहरात – पुण्यात १४ सप्टेंबर २०१९ रोजी ते २० सप्टेंबर २०१९ रोजीपर्यंत मॅचेस खेळेल. श्री शिव छत्रपती स्पोर्टस् कॉम्प्लेक्स महालुंगे, बालेवाडी येथे या स्पर्धा होतील.

महत्त्वाच्या बातम्या – 

३१ वी अखिल भारतीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती हॉकी स्पर्धा: होशिंगाबाद-भोपाळमध्ये अंतिम लढत रंगणार

विराट कोहलीच्या टीम इंडियाविरुद्ध खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात दाखल

…म्हणून संजू सॅमसनने मॅच फिचे दीडलाख रुपये दिले ग्राउंडस्टाफला

You might also like