गोल्ड कोस्ट |ऑस्ट्रेलियात चालू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला आज शुटींगमध्ये कोल्हापूरच्या तेजस्विनी सावंतने रौप्यपदक मिळवून दिले.
हे भारताचे स्पर्धेतील ५वे रौप्यपदक ठरले. तिने ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात ही कामगिरी केली. तिचे सुवर्णपदक २.१ गुणांनी हुकले. तिने आज या प्रकारात ६१८.९ गुणांची कमाई केली तर सुवर्णपदक विजेत्या सिंगापूरच्या मार्टीना लिंडसेने ६२१ गुण घेतले.
तेजस्विनी सावंत यापुर्वी दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेत याच प्रकारात रौप्य पदक पटकावले होते तर तिला आजपर्यंत २०१० च्या स्पर्धेत एकूण तीन पदके तर मेलबर्न राष्ट्रकुल स्पर्धेत २ सुवर्ण पदके मिळाली आहेत.
तिचे राष्ट्रकुल स्पर्धेत स्पर्धेतील हे एकूण ६वे पदक ठरले आहे.
२०१८ राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची आता एकूण २५ पदके झाली असून त्यात १२ सुवर्ण, ५ रौप्य आणि ८ कांस्यपदक आहेत.