पहिल्या अल्टिमेट खो खो स्पर्धेच्या सहाव्या दिवशी दुसऱ्या सामन्यात तेलगु योद्धाज संघाने राजस्थान वॉरियर्स संघावर 38 गुणांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या सामन्यात सचिन भार्गव आणि अरुण गुंकी यांनी केलेल्याप्रत्येकी 11गुणांसह रुकसन सिंगच्या 10 गुणांच्या जोरावर तेलगु योद्धाज संघाने राजस्थान वॉरियर्स संघावर 38 गुणांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला.
मागील सामन्यातील पराभवानंतर तेलगु योद्धाज संघाने सामन्यात आक्रमक सुरुवात करत पहिल्या डावात 44 गुणांची कमाई केली. तर, राजस्थान वॉरियर्सला 24 गुण कमावता आले.
दुसरीकडे आपल्या पहिल्या विजयासाठी अद्यापही धडपडत असलेल्या राजस्थान वॉरियर्स संघाने काही बहुमोल गुण आटोकाट प्रयत्न केला. परंतु तेलगु योद्धाज संघाने दुसऱ्या डावावरही संपूर्ण वर्चस्व गाजवताना आणखी 35 गुणांची नोंद केली आणि विजयाचे लक्ष्य राजस्थानच्या जणू काही आवाक्याबाहेरच नेऊन ठेवले. अखेरची सात मिनिटे शिल्लक असताना तेलगु योद्धाज संघाकडे 79-24 अशी दणदणीत आघाडी होती.
अखेरच्या सत्रात, राजस्थान वॉरियर्स संघाने 21 गुणांची नोंद करताना शर्थीचे प्रयत्न केले. परंतु तेलगु योद्धाज संघाने आपले वर्चस्व कायम राखताना 83-45 अशा एकतर्फी विजयची नोंद केली.
लीगमधील सर्वोत्तम आक्रमक खेळाडू असलेल्या मझहर जमादार याने 5 बळींसह 13 गुणांची नोंद करून राजस्थान वॉरियर्स कडून कर्णधाराला साजेशी झुंज दिली. मात्र त्याची ही खेळी राजस्थानचा पराभव टाळू शकली नाही.
उद्या विश्रांतीचा दिवस असून मंगळवारी 23 ऑगस्ट रोजी, मुंबई खिलाडीज विरुद्ध तेलगु योद्धाज यांच्यात पहिला सामना तर, दुसरा सामना गुजरात जायंट्स विरुद्ध चेन्नई क्विक गन्स यांच्यात होणार आहे.
अमित बर्मन यांनी पुरस्कृत केलेल्या अखिल भारतीय खो खो फेडरेशनच्या सहकार्याने आयोजित या स्पर्धेचे प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर ही लीग पाच वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रसारित करण्यात येणार आहे. सोनी टेन 1 (इंग्रजी), सोनी टेन 3 (हिंदी आणि मराठी), सोनी टेन 4 (तेलुगु आणि तमिळ) चॅनेलवरून अल्टीमेट खो खोचे थेट कव्हरेज दररोज संध्याकाळी 7:00 वाजता सुरू प्रसारित करण्यात येणार आहे. लीग प्रीमियम ओटीटी प्लॅटफॉर्म, सोनी लाईव्हवर लाइव्ह-स्ट्रीम देखील करण्यात येणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शुबमन गिलने सगळ्यांना टाकले मागे, वनडे क्रिकेटमध्ये रचला ‘हा’ बलाढ्य विक्रम
भारत-पाकिस्तानपाठोपाठ श्रीलंकेलाही धक्का! मोठा मॅचविनर आशिया कपमधून बाहेर
उधारीची जर्सी घालणाऱ्या धवनकडे चाहत्याने मागितला शर्ट, गब्बरची रिएक्शन पाहून तुम्हीही म्हणाल…