पोलॅंड पार्कच्या (Poland park) मैदानावर दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) यांच्यातील ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघ केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार टेंबा बावुमाने (Temba bavuma) तुफानी अर्धशतकी खेळी केली. यासह त्याने भारतीय संघाविरुद्ध खेळताना मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाला चांगली सुरुवात मिळाली नव्हती. क्विंटन डी कॉक (Quinton dekock) आणि जानेमन मलान (Janeman malan) स्वस्तात माघारी परतले होते. त्यानंतर टेंबा बावुमा आणि रासी वान डर दुसेन यांनी शतक झळकावत दक्षिण आफ्रिका संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. दोघांमध्ये चौथ्या गडीसाठी २०४ धावांची भागीदारी झाली.
व्हिडिओ पाहा- सचिन-कांबळीच्या करामतीने गांगुलीच्या रुममध्ये झालेलं पाणीच पाणी|
असा कारनामा करणारा ठरला पाचवा कर्णधार
टेंबा बावुमा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला त्यावेळी दक्षिण आफ्रिका संघ अडचणीत होता. टेंबा बावुमाने संयमी खेळी केली. त्याने १४३ चेंडूंचा सामना करत ८ चौकारांच्या साहाय्याने ११० धावांची खेळी केली. दरम्यान शतक पूर्ण करताच तो भारतीय संघाविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा दक्षिण आफ्रिकेचा पाचवा कर्णधार ठरला आहे. यापूर्वी एबी डीविलियर्सने भारतीय संघाविरुद्ध ४ शतक झळकावले होते. तर ग्रॅमी स्मिथ, जॅक कॅलिस, फाफ डू प्लेसिस, टेंबा बावुमा यांना प्रत्येकी १-१ शतक झळकावण्यात यश आले आहे.
वनडे क्रिकेटमध्ये भारतीय संघाविरुद्ध शतक झळकावणारे दक्षिण आफ्रिकेचे कर्णधार
४ शतक – एबी डीविलियर्सने
१ शतक – ग्रॅमी स्मिथ
१ शतक – जॅक कॅलिस
१ शतक – फाफ डू प्लेसिस
१ शतक – टेंबा बावुमा*
दक्षिण आफ्रिका संघाने पहिल्या उभारला २९६ धावांचा डोंगर
या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दक्षिण आफ्रिका संघाकडून प्रथम फलंदाजी करताना, रासी वान डर दुसेनने सर्वाधिक १२९ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने ९ चौकार आणि ४ षटकार मारले. तर टेंबा बावुमाने ८ चौकारांच्या साहाय्याने ११० धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिका संघाला ५० षटक अखेर ४ बाद २९६ धावा करण्यात यश आले.
महत्वाच्या बातम्या :
भारताचा २६वा वनडे कर्णधार बनला केएल राहुल, पाहा आजवर झालेल्या वनडे कर्णधारांची संपू्र्ण यादी
“आता विंटेज रूप पाहायला मिळणार”, विराटच्या ‘त्या’ पोस्टवर चाहत्यांकडून प्रतिक्रियांचा पाऊस
हे नक्की पाहा :