दक्षिण अफ्रिका आणि भारत (sa vs ind odi series) यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना केपटाऊनमध्ये खेळला जात आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत एकदिवसीय मालिकेत केएल राहुल (KL Rahul) भारताचे नेतृत्व करत आहे. तिसऱ्या सामन्यात केएल राहुलने नाणेफेक जिंकली आणि दक्षिण अफ्रिकेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय संघाने दक्षिण अफ्रिकेच्या पहिल्या दोन विकेट्स स्वस्तात मिळवल्या. यादरम्यान राहुलने अप्रतिम क्षेत्ररक्षण प्रदर्शन केले.
क्षेत्ररक्षण करताना कर्णधार राहुलने उत्कृष्ट प्रदर्शन करून एक चौकार रोखला. त्यानंतर काही वेळाने त्याने दक्षिण अफ्रिकी कर्णधार टेंबा बवुमा (Temba Bavuma) याला धावबाद देखील केले. राहुलच्या डायरेक्ट हिटमुळे बवुमा धावबाद झाला, यावेळी भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहर गोलंदाजी करत होता. भारतीय संघाला सामन्यात मिळालेली ही दुसरी विकेट होती.
दक्षिण अफ्रिकेच्या डावातील सातव्या षटकात दीपक चहर गोलंदाजी करत होता. षटकातील तिसऱ्या चेंडूवर टेंबा बवुमा तंबूत परतला. बवुमाने मिड ऑफ च्या दिशेने हा चेंडू खेळला आणि एक धाव घेण्यासाठी धावला होता. पण त्याठिकाणी केएल राहुल क्षेत्ररक्षणासाठी उभा होता आणि त्याने नेम धरून चेंडू योग्य निशाण्यावर मारला. राहुलचा चेंडू थेड स्टंपवर लागल्यामुळे बवूमा धावबाद झाला आणि दक्षिण अफ्रिकेने ३४ धावासंख्येवर त्यांची दुसरी विकेट गमावली. बवुमाची वैयक्तिक धावसंख्या त्यावेळी ८ होती.
WICKET! #SAvIND
South Africa skipper Temba Bavuma run out on 8. pic.twitter.com/LdNG3COq8n
— Doordarshan Sports (@ddsportschannel) January 23, 2022
टेंबा बावुमाने मालिकेतील पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये अप्रतिम प्रदर्शन केले होते. मात्र, या सामन्यात मात्र तो स्वस्तात बाद झाला. बवुमाच्या विकेटपूर्वी भारताला पहिली विकेट दीपक चहरने मिळवून दिली होती. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर दक्षिण अफ्रिकेचा जानेमन मलान यष्टीरक्षक रिषभ पंतच्या हातात झेल देऊन बाद झाला. दक्षिण अफ्रिका संघाने पहिल्या १० षटकांमध्ये त्यांच्या दोन महत्वाच्या विकेट्स गमावल्या.
दरम्यान, दक्षिण अफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेचा विचार केला, तर भारतीय संघाने मालिका गमावली आहे. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून दक्षिण अफ्रिकेने २-० अशी विजयी आघाडी गेतली आहे. तसेच कसोटी मालिकेत देखील दक्षिण अफ्रिका संघ २-१ अशा फरकाने विजयी ठरला होता.
महत्वाच्या बातम्या –
संधी मिळताच चहरने करून दाखवली अशी कामगिरी, जी तीन वर्षांत करण्यास तरसलेले गोलंदाज
आयसीसीने केली वर्षातील सर्वोत्तम पुरुष व महिला टी२० खेळाडूंची घोषणा; घ्या जाणून कोण आहेत मानकरी
रडू की हसू…! एकाच चेंडूवर २ वेळा गेली विकेट, विचित्र पद्धतीने रनआऊट झाला आंद्रे रसेल
व्हिडिओ पाहा –