दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला बुधवारी (30 ऑगस्ट) सुरुवात झाली. डर्बन येथे सुरू झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी तुफानी फटकेबाजी करत 226 धावा उभ्या केल्या. यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज टीम डेव्हिड याने तुफानी अर्धशतक झळकावले. मात्र, त्याला बाद करताना दक्षिण आफ्रिकेच्या टेंबा बवुमा याने एक अप्रतिम झेल टिपला.
Temba Bavuma pulls off a screamer 🤯#SAvAUS pic.twitter.com/llsZLj6t0W
— FanCode (@FanCode) August 30, 2023
प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियासाठी कर्णधार मिचेल मार्श व टीम डेव्हिड यांनी वादळी फटकेबाजी केली. मार्शने आपल्यावरील जबाबदारी योग्यरीतीने पार पाडत 49 चेंडूवर 92 धावांची नाबाद खेळी केली. तर दुसऱ्या बाजूने डेव्हिड याने अवघ्या 28 चेंडूंमध्ये 64 धावा कुटल्या. त्याला फिरकीपटू तबरेज शम्सी याने बाद केले. मात्र, त्याला बाद करताना टेंबा बवुमा याने एका अप्रतिम झेल पूर्ण केला.
शम्सी याला उंचावरून फटका मारण्याचा प्रयत्नात उंच उडालेला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने गेला. त्यावेळी बवुमा याने उलटे धावत जात, त्यानंतर झेपावत एक अप्रतिम झेल टिपला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(Temba Bavuma Took Stunner Of Tim David In First T20I)
महत्वाच्या बातम्या –
BREAKING! बाबर आझमकडून आशिया चषकाची वादळी सुरुवात, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
महिला क्रिकेटसाठी ईसीबीचा मोठा निर्णय! पुरुष आणि महिला खेळाडूंना एकसमान मॅच फी