---Advertisement---

सामाजिक कार्यातही सचिन ठरला ‘मास्टर ब्लास्टर’, केले हे मोठे काम

On: रविवार, मे 10, 2020 5:18 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी कर्णधार मास्टर ब्लास्टर सचिने तेंडूलकरने ४००० व्यक्तींना व विविध शालांत शिकत असलेल्या मुलांना मदत केली आहे. ही मुले मुंबई महानगरपालिका हद्दीतील असून सचिनने हाय ५ संस्थेच्या माध्यमातून ही मदत केली आहे.

हाय ५ ही मुंबईतील एक नाॅन प्राॅफिट संस्था असून ती मुलांसाठी काम करते. कोरोना व्हायरस या वैश्विक महामारीच्या काळात सचिनने केलेली ही मदत अतिशय महत्त्वाची आहे.

“जे लोक दररोज काम करुन कमवुन खातात, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या हाय ५ संस्थेला माझ्या शुभेच्छा,” असा ट्विट सचिनने केला आहे.

हाय ५ संस्थेनेही सचिनचे ट्विट करत आभार मानले आहे. “धन्यवाद सचिन. तु केलेल्या मदतीमधून आम्ही ४ हजार मुलांची मदत करणार आहोत. ही मुले व व्यक्ती मुंबई शहरातील असतील.” असे आपल्या ट्वीटमध्ये हाय ५ संस्थेने म्हटले आहे.

यापुर्वी सचिनने पंतप्रधान सहायता निधी व मुख्यमंत्री सहायता निधीला प्रत्येकी २५ लाख रुपये दिले होते. तसेच मुंबईतील जवळपास ५ हजार लोकांच्या एक महिन्याच्या किरण्याचा खर्चही सचिनने उचलला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---