पुणे । आर्यन भाटिया याने हरयाणाच्या अजय मलिक याच्यावर ६-४, ६-४ अशी सरळ दोन सेट्समध्ये मात केली. हा विजय नोंदवित त्याने टेनिसमधील मुलांच्या १७ वषार्खालील गटात उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत त्याच्यापुढे हरयाणाच्याच सुशांत दबास याचे आव्हान असणार आहे.
पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडीत शिवछत्रपती क्रीडानगरीमध्ये खेलो इंडिया ही स्पर्धा सुरु आहे. दबास याने उपांत्यपूर्व फेरीत चंडीगढच्या किसन हुडा याला ६-०, ६-१ असे निष्प्रभ केले. गुजरातच्या क्रिश पटेल याने उपांत्य फेरीत स्थान मिळविताना गुरु मक्कर याच्यावर ६-२, ६-२ असा सफाईदार विजय नोंदविला. गुजरातच्या जेविया देव यानेही उपांत्य फेरीकडे वाटचाल करताना अनीष राम्पोला याचे आव्हान ६-४, ६-२ असे संपुष्टात आणले.
मुलांच्या १७ वषार्खालील गटात महाराष्ट्राच्या सानीष ध्रुव याने दुसºया फेरीत पुडुचेरी संघाच्या अभिषेक रुद्रेश्वार याला ६-१, ६-० असे निष्प्रभ केले. मात्र त्याचा सहकारी अथर्व शर्मा याला पश्चिम बंगालच्या नितीन सिन्हा याच्याकडून ७-५, ४-६, १-६ असा पराभव पत्करावा लागला.
मुलींच्या २१ वषार्खालील गटात महाराष्ट्राच्या मिहिका यादव हिने उपांत्य फेरीत स्थान मिळविले. तिने उपांत्यपूर्व फेरीत तेलंगणाच्या काव्या बालसुब्रमण्यम हिला ६-०, ६-२ असे पराभूत केले. त्याआधी तिने चौथ्या मानांकित युब्रानी बॅनर्जी हिच्यावर ६-०, ६-२ असा सनसनाटी विजय नोंदविला होता. याच गटात झील देसाई, अग्रमानांकित महेक जैन या आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी विजयी वाटचाल कायम राखली.
महाराष्ट्राच्या प्रेरणा विचारे हिने १७ वषार्खालील गटात इशिता सिंग (हरयाणा) हिचा ६-३, ६-२ असा सरळ सेट्समध्ये पराभव करीत अपराजित्व राखले. दुहेरीत महाराष्ट्राच्या सई भोयार व ह्रदया शहा यांनी विजयी वाटचाल केली. त्यांनी चंडीगढच्या पाखी भट्ट व साक्षी मिश्रा यांना सरळ दोन सेट्समध्ये ६-०, ६-० ने पराभूत केले.
महत्त्वाच्या बातम्या-
–धोनी धोनी है! विराट कोहलीचाही विक्रम टाकला मागे
–सामनावीर विराट कोहलीकडून गांगुलीच्या त्या खास विक्रमाचीही बरोबरी