---Advertisement---

Video- कोर्टवरील हस्तमैथुनाचे हावभाव पडले महागात, टेनिसपटूला १३ लाखांचा दंड

On: बुधवार, जून 27, 2018 4:45 PM
---Advertisement---

लंडन | लंडन येथे सुरू असलेल्या क्वीन्स् क्लब चॅम्पियन्स स्पर्धेदरम्यान ऑस्ट्रेलियन टेनिसपटू निक क्रिगॉसने मोठ्या अडचणीत सापडला आहे.

सोमवार दि.25 जूनला क्रोएशियाच्या मरीन चिलिच विरुद्धच्या सामन्यात मध्यांतराच्या वेळी क्रिगॉसने अश्लिल कृत्य (हस्तमैथुन हावभाव) केल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

निक क्रिगॉसच्या कृत्यांबद्दल त्याला एटीपी (असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशन) ने 13 लाख रुपयांचा दंड केला आहे.

मरीन चिलिच विरुद्ध झालेल्या या सामन्यात पराभूत झालेल्या क्रिगॉसचे या स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले आहे.

निक क्रिगॉस टेनिसमधील बॅड बाॅय म्हणुन ओळखले जाते. अफाट गुणवत्ता असलेला हा खेळाडू त्याचा चुकिच्या गोष्टींमुळे कायमच वादात सापडतो. त्याकडे टेनिस जाणकार भविष्यातील एक मोठा खेळाडू म्हणुन पाहतात.

महत्त्वाच्या बातम्या-

-Video: हार्दिक पंड्याने घेतली आजी-माजी कर्णधारांची हटके…

-जगात अनेक क्रिकेटर झाले परंतु असा पराक्रम करणारा धोनी एकटाच!

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment