क्रीडाजगतातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. दिग्गज टेनिसपटू बोरिस बेकर यांना तब्बल अडीच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बोरिस हे दिवाळखोरी कायद्यांतर्गत दोषी आढळल्यानंतर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
या महिन्यात लंडनच्या साऊथवॉर्क क्राऊन कोर्टातील ज्युरीने बोरिस बेकर (Boris Becker) यांना दिवाळखोरी कायद्यांतर्गत चार आरोपांमध्ये दोषी ठरवले. यामध्ये मालमत्तांचे हस्तांतरण, कर्ज लपवणे आणि मालमत्ता उघड करण्यात अयशस्वी झाल्याच्या दोन आरोपांचा समावेश आहे. जून २०१७ मध्ये दिवाळखोर झाल्यानंतर बेकर यांनी ४२७०० युरो नऊ लोकांना हस्तांतरित केले. यामध्ये त्यांच्या पूर्वाश्रमीची पत्नी बार्बरा आणि शर्ली “लिली” बेकर यांचा समावेश आहे. जर्मनीमधील मालमत्ता घोषित न केल्याबद्दल आणि टेक फर्ममधील बँक कर्ज आणि शेअर्सचे ८२५००० युरो लपवल्याबद्दलही ते दोषी आढळला.
#BREAKING UK judge jails former tennis star Boris Becker for two and a half years pic.twitter.com/xc02xA64PY
— AFP News Agency (@AFP) April 29, 2022
हे सर्व आरोप फेटाळत सहावेळा ग्रँडस्लॅम चॅम्पियन बनणारे बेकर म्हणाले होते की, त्यांनी आपली मालमत्ता सुरक्षित करण्यासाठी काम करणाऱ्या विश्वस्तांना सहकार्य केले आणि तज्ञांच्या सल्ल्यानुसार काम केले.
२० प्रकरणात झाली निर्दोष मुक्तता
तब्बल ५४ वर्षे वय असलेल्या बेकर यांची इतर २० प्रकरणांमध्ये निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. ज्यात दोन विंबल्डन ट्रॉफी आणि ऑलिम्पिक सुवर्ण पदकांसह अनेक पुरस्कार प्रदान करण्यात ते अपयशी ठरल्याचा आरोप आहे.
बोरिस बेकर हे टेनिसमधील महान खेळाडू म्हणून ओळखले जातात. त्यांनी ६ ग्रँड स्लॅम विजेतेपदे जिंकली आहेत. बोरिसने १९८५मध्ये विंबल्डन ओपनमध्ये पहिले ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकले. त्यांनी ३ वेळा विंबल्डन, २ ऑस्ट्रेलियन ओपन आणि १ यूएस ओपनचे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एसपी गोसावी मेमोरियल पुणे आंतरक्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पीवायसी ३ संघाचा इलाईट गटात प्रवेश