भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा नव्या भूमिकेत दिसणार आहे. सानिया लवकरच टेनिस कोर्टवरून उडी घेत डिजिटल प्लॅटफॉर्मवर येणार आहे. ती ‘एमटीव्ही निषेध अलोन टुगेदर’ या वेब सीरिजमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. असे म्हटले जात आहे की, या शोचा उद्देश टीबी या रोगाप्रति जागरूकता पसरवणे आहे.
टेनिस स्टार सानिया मिर्झा नव्या भूमिकेत
सानियाने म्हटले की, “टीबी आपल्या देशातील सर्वात जुनी आरोग्य समस्यांपैकी एक आहे. टीबीची नोंद केलेली निम्मे प्रकरणे ३० वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये आहेत. आजारपणाचा सामना करण्याची व समज बदलण्याची खूप गरज आहे.”
“एमटीव्ही निषेध अलोन टुगेदर अनोख्या आणि प्रभावी पद्धतीने संदेश देतो. आजचा तरुण अधिक जागरूक, संवेदनशील आणि देशाला त्रास देणार्या समस्यांविषयी जागरूक आहे,” असे ती पुढे बोलताना म्हणाली.
डिजिटल प्लॅटफॉर्मवरून पसरवणार जागरूकता
“टीबी हा धोकादायक आहे आणि साथीच्या रोगाने त्याचा परिणाम आणखी वाईट झाला आहे. टीबी थांबविण्याची लढाई पूर्वीपेक्षा अधिक कठीण झाली आहे. यामुळे मला या प्रकल्पात सामील होण्याची प्रेरणा मिळाली. मला आशा आहे की माझ्या उपस्थितीने काही प्रमाणात सकारात्मक बदल घडतील,” असेही ती पुढे म्हणाली.
हा शो एक युवा विक्की आणि मेघा या जोडप्याच्या आव्हानाबद्दल आहे. विक्कीची भूमिका सय्यद रझा आणि मेघाची भूमिका प्रिया चव्हानने साकारली आहे.
शोमध्ये सानिया मिर्झा लॉकडाऊनदरम्यान युवा जोडप्यासमोर आलेल्या आव्हानांवर चर्चा करताना दिसेल. ५ भागांची ही मालिका नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात एमटीव्ही इंडिया आणि एमटीव्ही निषेधच्या सोशल मीडिया हँडलवर लाँच होईल.
एमटीव्ही निषेधचा प्रीमियर यावर्षी जानेवारीमध्ये झाला होता. शोमध्ये टीबीप्रति जागरूकता आणि योग्य औषध घेण्याचे महत्त्व विशेषत: कोव्हिड-१९च्या संदर्भात दाखवले होते.
वाचा-
-हातात चहाचा कप, डोळ्यावर गॉगल… राज ठाकरेंचा टेनिस कोर्टातील रुबाबदार फोटो व्हायरल
-भारताचा अव्वल टेनिसपटू रामकुमार रामनाथनला इतिहास घडविण्याची संधी
-अप्रतिम! पॅरिस ओपनमध्ये नदाल एक्सप्रेसचा धडाकेबाज विक्रम, आता पुढील लक्ष फेडररचा विश्वविक्रम