---Advertisement---

अप्रतिम! पॅरिस ओपनमध्ये नदाल एक्सप्रेसचा धडाकेबाज विक्रम, आता पुढील लक्ष फेडररचा विश्वविक्रम

On: गुरूवार, नोव्हेंबर 5, 2020 3:47 PM
---Advertisement---

पॅरिस | पॅरिस मास्टर्समध्ये बुधवारी (5 नोव्हेंबर) झालेल्या सामन्यात स्पेनचा टेनिसपटू फेलिसियानो लोपेझचा पराभव करत लाल मातीचा बादशाह राफेल नदालने पुरुष एकेरीत कारकीर्दीतील एक हजारावा विजय मिळवला.

फेलिसियानोने सामन्याच्या सुरुवातीला घेतली आघाडी
स्पेनचा टेनिसपटू फेलिसियानो लोपेझने सामन्याच्या सुरुवातीला उत्कृष्ट कामगिरी केली. त्यामुळे नदाल पिछाडीवर होता. मात्र त्यानंतर नदालने मुसंडी मारली आणि 4-6 7-6 (7-5) 6-4 ने सामना जिंकला.

फ्रेंच ओपनचा किताब केला नावावर
गेल्या महिन्यात एकही सेट न गमावता त्याने फ्रेंच ओपनचा किताब आपल्या नावावर केला होता. पॅरिस ओपनमधील या सामन्यात नदालने जोरदार कामगिरी करत सामन्यात पुनरागमन केले. दोन तास 30 मिनिटे चाललेल्या सामन्यात विजय मिळवला.

पुरुष एकेरीत सर्वाधिक विजय मिळवण्याऱ्या टेनिसपटूंच्या  यादीत  नादाल चौथा
जिमी कॉनर्स, रॉजर फेडरर आणि इव्हान लेन्डल या दिग्गज टेनिसपटूनंतर ओपन एरामध्ये (व्यावसायिक टेनिसला सुरुवात झाल्यापासून) सर्वाधिक विजय मिळविणार्‍या खेळाडूंच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आहे.

२०वे ग्रँडस्लॅम जिंकत केला पराक्रम
फ्रेंच ओपनमधील अंतिम सामन्यात नदालने दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविचचा पराभव केला होता. फ्रेंच ओपनमध्ये विजय मिळवत त्याने कारकिर्दीतील २०वा ग्रँडस्लॅम किताब जिंकला होता.

पुरुष एकेरीत सर्वाधिक सामने जिंकणारे टेनिसपटू :
जिमी कॉनर्स : 1272 विजय
रॉजर फेडरर : 1242 विजय
इव्हान लेन्डल : 1068 विजय
राफेल नादाल : 1000 विजय

 

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---