---Advertisement---

टी-20 वर्ल्ड कपपूर्वी जखमी खेळाडूंची यादी वाढली! आता ‘या’ स्टार खेळाडूच्या सहभागावर टांगती तलवार

On: सोमवार, फेब्रुवारी 2, 2026 8:58 PM
---Advertisement---

7 फेब्रुवारीपासून टी-20 वर्ल्ड कप 2026 ला सुरुवात होत आहे, पण त्यापूर्वीच अनेक दिग्गज खेळाडू जखमी झाल्याने संघांची चिंता वाढली आहे. आता या यादीत श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज ईशान मलिंगाचे (Ishaan malinga) नाव जोडले जाण्याची शक्यता आहे.

वर्ल्ड कपला मुकणाऱ्या किंवा सुरुवातीच्या सामन्यांतून बाहेर पडणाऱ्या खेळाडूंमध्ये पॅट कमिन्स, जोश हेजलवुड (काही सामन्यांसाठी), ॲडम मिल्ने, टोनी डी झोर्झी आणि डोनोवन फरेरा यांसारख्या नावांचा समावेश आहे. आता श्रीलंकेचा ईशान मलिंगा देखील दुखापतग्रस्त झाला आहे.

रविवारी पल्लेकेले येथे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात गोलंदाजी करताना ईशानच्या खांद्याला दुखापत झाली. श्रीलंका क्रिकेटने (SLC) दिलेल्या माहितीनुसार, ईशान मंगळवारी होणाऱ्या तिसऱ्या टी-20 सामन्याला मुकणार आहे. त्याच्या दुखापतीचे स्वरूप किती गंभीर आहे, हे समजून घेण्यासाठी त्याची MRI चाचणी केली जाणार आहे. या चाचणीनंतरच तो वर्ल्ड कप खेळणार की नाही, हे स्पष्ट होईल.

नोव्हेंबरमध्ये पदार्पण केल्यापासून मलिंगाने 8 सामन्यांत 8 विकेट्स घेतल्या आहेत. जर तो बाहेर पडला, तर यजमान श्रीलंकेला त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूची घोषणा करावी लागेल.

श्रीलंकेचे वर्ल्ड कपमधील वेळापत्रक:
भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या या वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेचे सर्व सामने त्यांच्या घरच्या मैदानावरच होणार आहेत.
8 फेब्रुवारी: विरुद्ध आयर्लंड (पहिला सामना)
12 फेब्रुवारी: विरुद्ध ओमान
16 फेब्रुवारी: विरुद्ध ऑस्ट्रेलिया
19 फेब्रुवारी: विरुद्ध झिम्बाब्वे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---