---Advertisement---

यष्टीरक्षक सॅमनससह कुलदीपने दाखवली चपळाई, टीम इंडियासाठी घेतले दोन जबरदस्त कॅच

Terrific catches by Sanju Samson & Kuldeep yadav
---Advertisement---

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील चौथा टी-20 सामना शनिवारी (12 ऑगस्ट) फ्लॉरिडामध्ये खेळला गेला. भारताने या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजी केली. आपल्या संघाला अर्शदीप सिंग याने सामन्यातील पहिल्या दोन विकेट्स मिळवून दिल्या. या विकेट्स घेण्यासाठी यष्टीरक्षक संजू सॅमसन आणि कुलदीप यादव यांनी चपळाई दाखवत जबरदस्त झेल पकडला.

फ्लॉरिडा टी-20 सामन्याने वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण हा निर्णय त्यांच्या वरच्या फळीतील फलंदाज योग्य ठरवू शकले नाहीत. संघाची धावसंख्या 54 असताना वेस्ट इंडीजने दुसरी, तर धावसंख्या 57 असताना चौथी विकेट गमावली. कायल मेयर्स याच्या रुपात वेस्ट इंडीजला पहिला झटका दिला, तो अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) याने.

डावातील दुसऱ्या षटकात अर्शदीप गोलंदाजीला आळा आणि त्याने चौथ्या चेंडूवर कायल मेअर्स (Kyle Meyers) याला तंबूचा रस्ता दाखवला. यष्टीरक्षक संजू सॅमसन (Sanju Samson) याने याने अप्रतिम झेल टिपला आणि मेयर्सला खेळपट्टी सोडावी लागली. त्यानंतर अर्शदीप आपने आपल्या पुढच्याच षटकात ब्रँडन किंग (Brandon King) याला कुलदीप यादवच्या हाताच झेलबाद केले. वेस्ट इंडीजच्या डावातील हे सहावे षटक असून कुलदीपने नेंत्रदीपक झेल पकडला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

https://twitter.com/CricCrazyJohns/status/1690378214273880064?s=20

उभय संघांतील या सामन्यात पुढच्या दोन विकेट्स कुलदीप यादवला मिळाले. वेस्ट इंडीजने आपली तीन आणि चार क्रमांकाची विकेट डावातील सातव्या षटकात गमावली. या दोन्ही विकेट्स एकाच षटकात कुलदीप यादवने घेतल्या. मालिकेचा एकंदरीत विचार केला, तर पहिल्या दोन सामन्यांमध्ये वेस्ट इंडीजला विजय मिळला होता. तिसऱ्या सामन्यात भारताने जबरदस्त पुनरागमन करत विजय मिळवला. मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघाला चौथा आणि पाचचवा सामना जिंकणे गरजेचे आहे. (Terrific catches by Samson & Kuldeep. Fantastic bowling by Arshdeep)

महत्वाच्या बातम्या –
WIvsIND । आपल्या खेळाडूंवर हार्दिकला विश्वास! चौथ्या सामन्यात नाणेफेक गमावली, पण प्लेइंग इलेव्हन तीच
‘तो कंफ्यूज दिसत होता…’, हार्दिकच्या नेतृत्वाबाबत भारतीय खेळाडूची मोठी प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---