सिडनी। भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध चौथा आणि शेवटचा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर सुरु आहे. या सामन्याचा आज(4 जानेवारी) दुसरा दिवस आहे. या सामन्यात भारताने पहिल्या डावात 500 धावांचा टप्पा पार केला आहे.
आज भारताकडून यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक केले आहे. त्याने हे शतक 137 चेंडूत पूर्ण केले. त्याने त्याचे पहिले शतक इंग्लंडमध्ये द ओव्हल मैदानावर केले होते.
त्यामुळे तो ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड(सेना देश) या देशात मिळून दोन शतके करणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक आहे. याआधी सेना देशांमध्ये एकाही भारतीय यष्टीरक्षकाला शतक करता आलेले नाही.
त्याचबरोबर रिषभ पंत हा ऑस्ट्रेलियामध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावा करणाराही भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे. तसेच तो इंग्लंडमध्ये आणि ऑस्ट्रेलियामध्ये शतक करणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक आहे.
या सामन्यात रिषभ बरोबरच चेतेश्वर पुजाराने शतकी खेळी करताना 193 धावा केल्या आहेत. तर मयंक अगरवाल आणि रविंद्र जडेजाने अर्धशतक केले आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावा करणारे भारतीय यष्टीरक्षक-
139* – रिषभ पंत
89 – फारुख इंजिनियर
67* – किरण मोरे
62 – पार्थिव पटेल
57* – एमएस धोनी
महत्त्वाच्या बातम्या:
–कोणालाही आवडणार नाही असा विक्रम करणारा पुजारा ठरला आठवा भारतीय
–दिडशतकी खेळीनंतरही असा नकोसा विक्रम करणारा चेतेश्वर पुजारा दुसरा भारतीय
–या कारणामुळे सिडनी कसोटीत भारत-ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी बांधली हाताला काळी पट्टी