अफगाणिस्तान आणि आयर्लंड यांच्यात सध्या कसोटी मालिका खेळली जात आहे. ज्याचा पहिला सामना बुधवार 28 फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. तसेच सामना सुरू होण्याच्या काही वेळापूर्वी या सामन्याचे ठिकाण बदलण्यात आले आहे. यापूर्वी हा सामना अबुधाबीच्या झायेद क्रिकेट स्टेडियमवर होणार होता. त्यानंतर आता हा सामना टॉलरन्स ओव्हलवर खेळला जात आहे. सामन्याचे ठिकाण अचानक बदलण्याचे मोठे कारणही अशात समोर आले आहे.
खरं तर, अफगाणिस्तान आणि आयर्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना अबुधाबीच्या झायेद क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार होता. मात्र स्थानिक शालेय क्रीडा स्पर्धेमुळे अखेरच्या क्षणी सामन्याचे ठिकाण बदलण्यात आले आहे. त्यामुळे अबू धाबी स्कूल स्पोर्ट्स चॅम्पियनशिपने आपल्या स्पर्धेसाठी झायेद स्टेडियमची निवड केली होती. त्यानंतर अफगाणिस्तान आणि आयर्लंडमधील कसोटी सामना टॉलरन्स ओव्हल स्टेडियममध्ये हलवण्यात आला आहे.
अशातच आता प्रथमच टॉलरन्स ओव्हलवर आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळवला जात असून तेथील आसन क्षमता 20 हजार आहे, तर टॉलरन्स ओव्हलमध्ये प्रेक्षकांची आसनक्षमता 12 हजार आहे. तसेच नंतर सामन्याचे ठिकाण बदलण्यासाठी पाठिंबा दिल्याबद्दल अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड, क्रिकेट आयर्लंड, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद यांचे अबू धाबी क्रिकेट अँड स्पोर्ट्स हबचे सीईओ मॅट बाउचर यांनी आभार देखील मानले आहेत.
Irish players have arrived in UAE and warm welcomed by host Afghanistan.
They will be starting their multi-format tour by one-off test scheduled on 28th of February.#AFGvsIRE pic.twitter.com/mUC0bJ7ph8
— Sayed Naseem Sadaat (@SNaseemSadaat) February 24, 2024
याबरोबरच टॉलरन्स ओव्हलवर खेळला जाणारा हा कसोटी सामना आयर्लंड क्रिकेट संघासाठी खूप खास आहे. 2018 साली आयर्लंड संघाला कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळवला होता. त्यानंतर आयर्लंडने एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. आता या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव करून आयर्लंड संघाला पहिला कसोटी सामना जिंकण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे.
What a funny coincidence in cricket…!!
Ibrahim Zadran is opening with his uncle Noor Ali Zadran and Zadran handed him the test cap a few weeks back..!!😮😮 #HimachalPradesh #KaneWilliamson #RohitSharma #INDvsENG #INDvENG #CricketTwitter #ViratKohli #AFGvsIRE #IREvsAFG pic.twitter.com/EqfAldQFiM
— Arpita Singhal (@Arpita_singhal2) February 28, 2024
दरम्यान, अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड कसोटी नंतर अफगाणिस्तान आणि आयर्लंड यांच्यामध्ये तीन एकदिवसीय सामने आणि तितक्याच T20 सामने होणार आहेत. तर हे सर्व सामने शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवरती होणार आहेत.
महत्वाच्या बातम्या –