---Advertisement---

तब्बल १० खेळाडू कसोटी मालिकेपूर्वी परतणार भारतात, पाहा संपूर्ण यादी

---Advertisement---

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वन डे व टी २० सामन्यांची मालिका समाप्त झाली आहे . ३ वन डे सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने भारताचा २-१ असा पराभव केला मात्र टी२० सामन्यात पुनरागमन करत भारताने ३ सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली. या दोन्ही मालिकेनंतर आता, मागील बहुप्रतिक्षित अशा ४ कसोटी सामन्यांची बॉर्डर- गावसकर मलिका १७ डिसेंबर पासून सुरु होणार आहे. मात्र त्यापूर्वी वन डे व टी २० संघातील हे १० खेळाडू भारतात परतणार आहेत.

कसोटी संघात स्थान न मिळाल्याने परतणार भारतात-
कर्णधार विराट कोहली व उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारताच्या कसोटी संघात वन डे व टी २० संघातील अनेक खेळाडूंना संधी मिळालेली नाही. या खेळाडूंमध्ये टी २० सिरीज गाजवणाऱ्या हार्दिक पांड्या व टी. नटराजन यांचा देखील समावेश आहे.

हे खेळाडू परतणार भारतात-
कसोटी संघात स्थान न मिळालेले श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांडया, संजू सैमसन (विकेटकीपर), वाशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, दीपक चाहर, टी नटराजन , शिखर धवन व शार्दुल ठाकूर हे सर्व १० खेळाडू भारतात परतणार आहेत.

पहिला कसोटी सामना खेळून विराट देखील परतणार भारतात-
कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळल्यानंतर विराट देखील आपल्या पहिल्या आपत्याच्या जन्मा साठी भारतात परतणार आहे. विराटच्या अनुपस्थितीत मलिका विजय मिळवण्यासाठी भारतीय संघाला आपला खेळ उंचवावा लागेल.

महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तान क्रिकेटला अच्छे दिन, तब्बल १४ वर्षांनी हा संघ करणार पाकिस्तान दौरा
अजूनही निवृत्त झाला नाही २००३ क्रिकेट विश्वचषकातील हा हिरो, इतर सर्वांनी सोडले क्रिकेट
अन् क्रिकेटला सर्वस्व मानलेल्या पार्थिवची बारावीची परिक्षा हुकली…
शाहरुख खानच्या ५ क्रिकेटवरील जाहिराती, ज्यांनी एकवेळी घातला होता धुमाकूळ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---