वर्षाच्या शेवटी पाकिस्तान क्रिकेटसाठी एक खुशखबर आली आहे. तब्बल १४ वर्षांच्या मोठ्या प्रतीक्षेनंतर दक्षिण अफ्रिका संघ पाकिस्तान दौरा करणार आहे. याचबरोबर दक्षिण अफ्रिका संघ हा मागील १५ महिन्यांत पाकिस्तान दौरा करणारा चौथा संघ ठरणार आहे.
असे असेल दौऱ्याचे वेळापत्रक –
दक्षिण अफ्रिका संघ पुढील वर्षी (२०२१) जानेवारी – फेब्रुवारीमध्ये २ कसोटी आणि ३ टी २० सामन्यांसाठी पाकिस्तान दौरा करणार आहे. या अगोदर २००७ मध्ये दक्षिण अफ्रिकेने आपला शेवटचा पाकिस्तान दौरा केला होता. त्यावेळी अफ्रिकेने यजमान पाकिस्तानचा २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने पराभव केला होता. अफ्रिका संघाला त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याची आशा असेल.
मागील १५ महिन्यात पाकिस्तान दौरा करणारा दक्षिण अफ्रिका चौथा संघ-
मागील १५ महिने पाकिस्तान क्रिकेटसाठी नवसंजीवनी देणारे ठरले आहे. दक्षिण अफ्रिका संघा अगोदर श्रीलंका, बांग्लादेश आणि झिंबाब्वे संघाने पाकिस्तान दौरा केला होता. २००९ साली पाकिस्तानमध्ये श्रीलंकन खेळाडूंवर आतंकवादी हल्ला झाला होता, त्यानंतर जवळ जवळ सर्वच क्रिकेट संघांनी पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यास नापसंती दर्शवली होती.
PSL मध्ये अनेक दक्षिण अफ्रिकन खेळाडू झाले होते सहभागी –
माजी दक्षिण अफ्रिकन कर्णधार फाफ ड्यू प्लेसिससह अनेक अफ्रिकन खेळाडूंनी या पूर्वी पाकिस्तान सूपर लीग ( PSL) मध्ये आपला सहभाग नोंदवला होता. त्यामुळे दोन्ही देशातील क्रिकेट मंडळांना हा दौरा यशस्वी ठरेल याची आशा आहे. (South Africa to tour Pakistan for the first time in 14 years for two Tests and three T20Is.)
महत्त्वाच्या बातम्या-
–अजूनही निवृत्त झाला नाही २००३ क्रिकेट विश्वचषकातील हा हिरो, इतर सर्वांनी सोडले क्रिकेट
–अन् क्रिकेटला सर्वस्व मानलेल्या पार्थिवची बारावीची परिक्षा हुकली…
–…जो काही आहे ते या दोन कर्णधारांमुळेच, पार्थिव पटेलनं सांगितली आवडत्या सनसेनापतींची नावं
–या गोष्टीचा विश्वचषकासाठी भारतीय संघ निवडताना विचार केला जाणार नाही!