चेन्नई सुपर किंग्स संघाला इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएलचे ४ किताब जिंकून देणाऱ्या एमएस धोनीबद्दल मोठी बातमी समोर येत आहे. आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळण्यासोबतच धोनीने या स्पर्धेसाठीच्या एका जाहिरातीत काम केले होते, जी ब्रॉडकास्टर चॅनेलवर दाखवली जात होती. मात्र, आता ही जाहिरात द ऍडव्हर्टायझिंग स्टँडर्ड काऊंसिल ऑफ इंडियाने (ASCI) हटवण्यास सांगितले आहे.
काय आहे या जाहिरातीत?
या जाहिरातीत एमएस धोनीचा (MS Dhoni) समावेश आहे. या जाहिरातीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. कन्झ्युमर युनिटी अँड ट्रस्ट सोसायटीने (CUTS) ही तक्रार दाखल केली होती. ही एक रस्ता सुरक्षा संस्था आहे. ही जाहिरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारी असल्याचे कट्सने आपल्या तक्रारीत सांगितले आहे.
या जाहिरातीत धोनीला एका बस चालकाच्या रूपात दाखवण्यात आले आहे. तो एका गर्दीच्या रस्त्यामध्येच बस थांबवतो. या जाहिरातीत दाखवलंय की, जेव्हा एक पोलीस अधिकारी तिथे येऊन धोनीला प्रश्न विचारतो, तेव्हा त्याला उत्तर मिळते की, आयपीएलची सुपर ओव्हर पाहत आहे. वाहतूक पोलीस आयपीएलदरम्यान हे होत असल्याने या गोष्टीला सामान्य असल्याचे मानतो आणि निघून जातो.
एएससीआयने या तक्रारीची दखल घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच ग्राहक तक्रार समिती (CCC) सदस्यांनी ही जाहिरात करणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधींसोबत बसून ही जाहिरात पाहिली. एएससीआयने ओळखले की, ही जाहिरात नियमांचे उल्लंघन करणारी आहे. कंपनीला २० एप्रिलपर्यंत ही जाहिरात काढून टाकण्याचे किंवा त्यात बदल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कंपनीने ते मान्य केले आहे आणि जाहिरात काढून टाकण्याचे लेखी हमीपत्र दिले आहे.
धोनीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. या व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये असे लिहिले होते की, “जेव्हा गोष्ट आयपीएलची असते, तेव्हा चाहते सामना पाहण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. कारण, #YehAbNormalHai!, या नवीन हंगामापासून तुम्हाला काय अपेक्षा आहेत?”
When it's the #TATAIPL, fans can go to any extent to catch the action – kyunki #YehAbNormalHai!
What are you expecting from the new season?@StarSportsIndia | @disneyplus pic.twitter.com/WPMZrbQ9sd
— IndianPremierLeague (@IPL) March 4, 2022
एमएस धोनी खेळत असलेल्या चेन्नई संघाच्या आयपीएल २०२२मधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर चेन्नईने आतापर्यंत ३ सामने खेळले आहेत. मात्र, त्यातील एकाही सामन्यात त्यांना विजय मिळवता आलेला नाहीये. ते गुणतालिकेत आठव्या स्थानी आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2022 | कर्णधार रोहित शर्माच्या चेहऱ्याचा उडाला रंग, सलग तिसऱ्या पराभवानंतरची रिएक्शन व्हायरल
‘मीच हैराण आहे’, मुंबई इंडियन्सविरुद्ध वादळी खेळीबद्दल कमिन्सचे मोठे भाष्य
चेन्नई पुढे मुंबई मागे-मागे, IPLमध्ये दोन्ही संघाबाबत काही गोष्टी पहिल्यांदाच घडल्यात, वाचा…