ठाणे जिल्ह्या कबड्डी असोसिएशनचे रविवार दिनांक १९ ऑगस्ट रोजी पंच शिबिराचे आयोजन केले आहे. शिवशंकर क्रीडा मंडळ याच्या विद्यमाने शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिरामध्ये कबड्डी नियमांची उजळणी व अखिल भारतीय महासंघाच्या वतीने बदल करण्यात आलेल्या नियमांची उजळणी व्हावी म्हणून शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे
मागील काही दिवसात मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड जिल्हा व पुणे जिल्हा यांची पंच शिबीर पार पडली आहेत.
ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे हे शिबीर सेंट्रल रेल्वे हॉस्पिटलच्या समोर, रेल्वे इन्स्टिट्यूट हॉल, कल्याण येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५:३० वाजता पार पडेल.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–एशियन गेम्समधून लिएंडर पेसची माघार
–एशियन गेम्स २०१८ कबड्डीचे वेळापत्रक जाहीर