---Advertisement---

ठाणे हम्पी हिरोज पुन्हा अव्वल स्थानी

On: रविवार, एप्रिल 9, 2023 9:33 PM
Kabaddi
---Advertisement---

आजचा दुसरा सामना बलाढ्य ठाणे हम्पी हिरोज विरुद्ध धुळे चोला वीरांस यांच्यात झाला. ठाणे संघाने 2 विजय तर 1 सामना बरोबरीत राहिला होता. तर धुळे संघाला गुणतालिकेत अजून गुणांचा खात उघडता आला नव्हता. ठाणे च्या मंगेश सोनावणे ने आक्रमक चढाया करत संघाला भक्कम आघाडी मिळवून दिली.

ठाणे हम्पी हिरोज संघाने मध्यंतराला 32-13 अशी आघाडी मिळवली होती. ठाणेच्या मंगेश सोनावणे ने सुपर टेन पूर्ण करत संघाला मोठी आघाडी मिळवून देण्यात मोलाची भूमिका निभावली. त्याला कौस्तुभ शिंदे ने चांगली साथ दिली. ठाणे संघाने धुळे संघावर तीन लोन पडत सामना एकतर्फी केला.

ठाणे संघाने 56-28 असा मोठा विजय मिळवत रत्नागिरी संघाला मागे टाकत पुन्हा एकदा पहिल्या स्थानावर झेप घेतली. ठाणे कडून मंगेश सोनावणे ने सर्वाधिक 17 गुण मिळवले तर कौस्तुभ शिंदे ने चढाईत 9 गुण मिळवले. तर चिन्मय गुरव ने महत्वाचे गुण मिळवले. अहमद इनामदार ने 3 पकडी केल्या. तर धुळे कडून मितेश कदम ने सुपर टेन तर नरेंद्र खेर ने 4 पकडी करत चांगला खेळ केला (Thane Hampi Heroes is again on top)

बेस्ट रेडर- मंगेश सोनावणे, ठाणे हम्पी हिरोज
बेस्ट डिफेंडर्स- नरेंद्र खेर, धुळे चोला वीरांस
कबड्डी का कमाल- चिन्मय गुरव, ठाणे हम्पी हिरोज

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

ठाणे हम्पी हिरोज आणि नांदेड चांबल चॅलेंजर्सचा सलग दुसरा विजय  
रत्नागिरी अरावली ॲरोजचा तिसरा विजय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---