कोल्हापूर ताडोबा टायगर्स विरुद्ध ठाणे हम्पी हिरोज असा प्रमोशन फेरीच्या सहाव्या दिवशी पहिला सामना झाला. कोल्हापूर संघ 22 गुणांसह दुसऱ्या स्थानी होता तर ठाणे संघ केवळ 7 गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर होता. ठाणे संघा टॉप 2 च्या शर्यतीतुन बाहेर पडला असला तरी टॉप 6 मध्ये स्थान मिळवण्यासाठी आजचा विजय आवश्यक होता.
सामन्याची सुरुवात दोन्ही संघांनी सावध केली. पहिल्या पाच मिनिटांत 2-2 असा बरोबरीत सामना सुरू होता. दोन्ही संघ तिसऱ्या चढाईवर खेळण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर ठाण्याच्या चिन्मय गुरव व मंगेश सोनावणे च्या आक्रमक खेळीने ठाणे संघाने छोटी आघाडी मिळवली होती मात्र कोल्हापूरच्या तेजस पाटील ने चपळाई दाखवत पुन्हा एकदा सामना 8-8 असा बरोबरीत आणला. मध्यांतरा ठाणे संघाने 15-10 अशी आघाडी मिळवली होती.
मध्यांतर नंतर ठाणे संघाने कोल्हापूर संघाला ऑल आऊट करत आघाडी वाढवली. ठाणेच्या मंगेश सोनावणे ने आक्रमक चढाया करत संघाला आघाडी मिळवून दिली. तर बचावपटू यश भोईर ने हाय फाय पूर्ण करत महत्वपूर्ण भूमिका निभावली. ठाणे संघाने उत्तरार्धात सामना एकतर्फी करत 41-22 अश्या फरकाने जिंकत दुसऱ्या स्थानावर असलेल्या कोल्हापूर संघाला धक्का दिला. ठाणे कडून मंगेश सोनावणे ने चढाईत 11 गुण मिळवले तर पकडीत यश भोईर व प्रथमेश बालेकुंदरी ने प्रत्येकी 5 गुण मिळवले. चिन्मय गुरव ने 7 गुणांची अष्टपैलू खेळी खेळली. तर कोल्हापूर कडून तेजस पाटील ने 12 गुण मिळवले.
बेस्ट रेडर- तेजस पाटील, कोल्हापूर ताडोबा टायगर्स
बेस्ट डिफेंडर- यश भोईर, ठाणे हम्पी हिरोज
कबड्डी का कमाल- प्रथमेश बालेकुंदरी, ठाणे हम्पी हिरोज
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दुखापतग्रस्त पंतच्या फिटनेसची नवी अपडेट, वनडे विश्वचषकातून पत्ता कट!
‘वडिलांच्या कारकिर्दीतून धडा घे…’, अर्जुन तेंडुलकरला माजी दिग्गजाकडून मिळाला ‘हा’ मोलाचा सल्ला