---Advertisement---

१०० कसोटी खेळलेला धोनीचा संघसहकारी म्हणतोय, धोनी तेव्हाच घेणार निवृत्ती

On: रविवार, मे 17, 2020 10:54 AM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर फलंदाज मेथ्थ्यु हेडनने एमएस धोनी योग्य वेळ आल्यावर निवृत्ती घेणार असल्याचे भाष्य केले आहे.

“तुम्ही धोनीचे चांगले मित्र असताना त्याच्या कारकिर्दीवर बोलणं योग्य ठरणार नाही. जगातील सर्व चॅंम्पियन खेळाडूंना माहित असतं की केव्हा थांबायचं व धोनी एक चॅंम्पियन खेळाडू आहे. ते कारकिर्दीच्या शेवटी उगीच खेळत रहात नाही, ” असे हेडन म्हणाला.

“धोनीने कारकिर्दीत वेळोवेळी योग्य निर्णय़ घेतले आहे आणि निवृत्तीचा निर्णय़ देखील तो योग्य वाटेल तेव्हा घेईल,” असे यावेळी हेडन म्हणाला.

हेडनने आयपीएलमध्ये ३२ सामन्यात ११०७ धावा केल्या आहेत. तो केवळ चेन्नई सुपर किंग्जकडूनच सामने खेळला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---