ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका सध्या खेळली जात आहे. मालिकेतील दुसरा सामना रविवारी (11 फेब्रुवारी) ऑस्ट्रेलियाने 34 धावांनी वेस्ट इंडीजला पराभूत केले. दिग्गज अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल याने या सामन्यात कारकिर्दीतील पाचवे टी-20 आंतरराष्ट्रीय शतक ठोकले. ही खेळी ऑस्ट्रेलियन संघासाठी महत्वाची ठरलीच. पण मॅक्सवेलचा आत्मविश्वास देखील या शतकानंतर वाढला आहे. काही दिवसांपूर्वी याच शहरात मॅक्सवेलसोबत एक नकोशी घटना घडली होती. शतकी खेळीनंतर मॅक्सवेल याविषयी बोलला.
जानेवारी 2024 मध्ये ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) ऍडिलेटमधील एका पबमध्ये जास्त दारू पिला होता. याच कारणास्तव त्याला रुग्णालयात भरती देखील करावे लागले होते. 19 जानेवारी रोजी पबमध्ये पार्टी करताना त्याच्यासोबत घडलेला हा प्रकार चर्चेचा विषय ठरला होता. रविवारी (11 फेब्रुवारी) शतक केल्यानंतर मॅक्सवेलने या वाईट अनुभवाचा देखील उल्लेख केला. तो म्हणाला, “मला वाटते या घटनेचा परिणाम जितका माझ्यावर झाला, तितकाच माझ्या कुटुंबावर देखील झाला.”
या घटनेनंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मॅक्सवेलला एका आठवड्याची सुट्टी दिली होती. याच कारणास्तव तो वेस्ट इंडीजविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळू शकला नव्हता. याविषयी अष्टपैलू पुढे म्हणाला, “माझ्याकडे एका आठवड्याची सुट्टी होती. मला माहीत होते की, मला क्रिकेटपासून दूर रहायचे आहे. मी परतल्यानंतर रनिंग केली आणि जिम मारली. त्यानंतर खऱ्या अर्थाने मला बरे आणि ताजेतवाने वाटू लागले.”
मॅक्सवेल पुडे असेही म्हणाला की, एडिलेडमधीत त्याचे अनुभव तसे पाहिले तर चांगले राहिले नाहीत. पण याठिकाणी शतक ठोकल्यानंतर आता त्याचा दृष्टीकोण बदलला आहे. “माझे आई-वडील इते आहेत. त्यांच्यासोबत एक-दोन वेळा एडिलेडला आले, तेव्हा ते दौरे खास राहिले नव्हते. मी मागच्या वेळी एडिलेडला येण्याचा प्रयत्न केला, तेव्हा माझा पाय तुटला होता. पण असो, या शतकानंतर गोष्टी पॉजिटिव्ह आहेत. माझे पूर्ण लक्ष्य आता आगमी टी-20 विश्वचषकावर आहे.”
दरम्यान, मॅक्सवेलने रविवारी शतक ठोकल्यानंतर भारतीय दिग्गज रोहित शर्मा याच्या विक्रमाची बरोबरी केली. आता रोहित आणि मॅक्सवेल या दोघांच्या नावावर प्रत्येकी पाच-पाच टी-20 आंतरराष्ट्रीय शतके आहेत. शतकांचा हा आकडा इतक कोणत्याही खेळाडूपेक्षा जास्त आहे. (‘That incident affected my family…’, referring to a bad experience from Maxwell after the fifth t20i century)
महत्वाच्या बातम्या –
AUS vs WI : ऑस्ट्रेलियाच्या संघात तिसऱ्या T20I साठी ‘या’ स्फोटक फलंदाजाचा समावेश; घ्या जाणून कोण आहे तो…
पुरुष प्रथम श्रेणी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा । अमर क्रीडा, सिद्धीप्रभा, ओम् पिंपळेश्वर, अंकुर स्पोर्टस् यांची विजयी सलामी.