भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळतो. सध्या सौराष्ट्र संघ रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत (Ranji Trophy Final) पोहोचला आहे. मात्र, जडेजाला या अंतिम सामन्यात खेळण्याची संधी मिळणार नाही. सूत्रांनुसार बीसीसीआयने (BCCI) हा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.
झाले असे की, सौराष्ट्र क्रिकेट असोशिएसनने बीसीसीआयशी जडेजाला अंतिम सामन्यात खेळवण्याबाबत विनंती केली होती. मात्र, बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने (Saurav Ganguly) या मागणीस नकार दिला आहे.
“मी जडेजासंदर्भात गांगुलीशी चर्चा केली होती, पण त्याने यास परवानगी देण्यास नकार दिला. मला बोलताना सौरव म्हणाला की, देश पहिले येतो मग राज्य येते.” असे सौराष्ट्र क्रिकेट असोशिएसनचे अध्यक्ष जयदेव शहा (Jaydev Shah) यांनी सांगितले.
कारण, ज्यावेळेला रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. त्याचदरम्यान दक्षिण आफ्रिकाविरुद्ध भारताची वनडे मालिका सुरु होणार आहे आणि या वनडे मालिकेत जडेजा खेळणं अपेक्षित आहे. त्यामुळे जडेजाला रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना खेळण्यासाठी गांगुलीने नकार दिला असण्याची शक्यता आहे.
पुढे बोलताना शहा म्हणाले की, “जर वास्तवात बीसीसीआयची इच्छा असेल की त्यांचे मुख्य खेळाडू महत्त्वाच्या देशांतर्गत सामन्यात खेळावेत. तर त्यांनी रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यादरम्यान कोणताही आंतरराष्ट्रीय सामना आयोजित करू नये, असे मला वाटते. पण प्रश्न असा आहे की, बीसीसीआय आयपीएलच्या दरम्यान कोणता आंतरराष्ट्रीय सामना आयोजित करेल का? नाही कारण इथून पैसा मिळतो. ” अशी टीका शहा यांनी बीसीसीआयवर केली आहे.
रणजी ट्रॉफीविषयी बोलताना शहा म्हणाले, “रणजी ट्रॉफीला तेव्हाच प्रसिद्धी मिळू शकते जेव्हा भारतीय संघातील मोठे खेळाडू रणजीच्या अंतिम सामन्यात खेळतील.”
रणजीचा अंतिम सामना राजकोट येथे सौराष्ट्र विरुद्ध बंगाल संघात (Saurashtra Vs Bengal) 9 ते 13 मार्चपर्यंत होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–आयपीएलसाठी या भारतीय खेळाडूची जोरदार तयारी…
–टीम इंडियाविरुद्ध फायनल खेळताना ऑस्ट्रेलियाला जाणवणार ‘त्या’ खेळाडूची कमतरता
–सचिन तेंडुलकरचा टीम इंडियाला वर्ल्डकप फायनलआधी खास सल्ला….!






