तसेच वेस्ट इंडीजच्या महिलांनाही फेब्रुवारी-मार्च महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये खेळण्यात आलेल्या टी२० विश्वचषकातील ४ सामन्यांचे मानधन देण्यात आलेले नाही.
याव्यतिरिक्त सर्वात मोठा फटका वेस्ट इंडीजच्या देशांतर्गत सामने खेळणाऱ्या खेळाडूंना बसला आहे. ज्यामध्ये अधिकाधिक खेळाडूंना २०२०च्या वेस्ट इंडीज चॅम्पियनशीप, ४ दिवसीय स्थानिक स्पर्धेसाठी आपल्या सामना मानधनची मोठी रक्कमदेखील मिळाली नाही.
स्थानिक खेळाडूंना २ प्रकारात करार केला जातो. यातील एका प्रकारात ९० खेळाडूंंच्या गटाचा समावेश असतो. जे ६ फ्रंचायझींबरोबर मासिक राखीव असतात. या सहा फ्रंचायझींमध्ये बार्बाडोस, गयाना, त्रिनिदाद, टोबॅगो, जमैका, लिवार्ड द्वीप आणि विंडवर्ड द्वीप समूह यांचा समावेश आहे.
या करारातील क्रिकेटपटू अ, ब, क आणि डेव्हलपमेंट या ४ श्रेणींमध्ये विभागले गेले आहेत. अ श्रेणीतील खेळाडूंना २,६६६ डॉलर दर महिना मिळतो. ब श्रेणीतील खेळाडूंना २,००० डॉलर आणि क श्रेणीतील खेळाडूंना १५०० डॉलर दिले जातात. तर डेव्हलपमेंट श्रेणीतील खेळाडूंना दर महिना १,००० डॉलर दिले जातात.
दुसऱ्या प्रकारच्या कराराअंतर्गत प्ले फॉर पे आहे. यामध्ये खेळाडूंना दर सामन्याच्या आधारावर मानधन दिले जाते. दोन्ही प्रकारच्या करारात सर्व क्षेत्रातील खेळाडूंना प्रत्येक सामन्यासाठी १६०० डॉलर दिले जातात.
वेस्ट इंडीज प्लेयर्स असोसिएशनचे (WIPA) मुख्य वेन लुईस (Wayne Lewis) यांनी क्रिकइंफोला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “करारातील स्थानिक खेळाडूंना त्यांचा पगार देण्यात आला आहे. परंतु देशांतर्गत ४ दिवसीय स्पर्धेचे शुल्क सध्या दिलेले नाही. प्ले फॉर पे करारातील खेळाडूंना पहिल्या ३ फेरीतील सामन्यांचे शुल्क दिलेले आहे.”
लुईस यांनी पुढे सांगितले की, “ज्या खेळाडूंबरोबर करार केला जातो, त्यांचा महिन्याचा पगार वेळेवर दिला जातो. तरीही त्यांनी हे मान्य केले की, वेस्ट इंडीजच्या महिला खेळाडूंचा टी२० विश्वचषकाच्या पुरस्कारातून रुपये मिळाले आहेत. परंतु त्यांना सामना शुल्क देण्यात आलेले नाही. तसेच पुरुष खेळाडूंनाही त्यांचे सामना शुल्क दिलेले नाही.”
“वेस्ट इंडीज प्लेयर्स असोसिएशन वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाच्या संपर्कात आहे. जेणेकरून खेळाडूंना त्यांचे शुल्क लवकरात लवकर देता येईल. क्रिकेट बोर्डाने डब्ल्यूआयपीएला आर्थिक संकटाबद्दल अगोदरच कल्पना दिली होती,” असेही लुईस पुढे म्हणाले.
ट्रेंडिंग घडामोडी-
-तब्बल ८ वर्षांनी सचिननी ओपन केली होती ती खास शाॅंपेन, कारणही होते तसेच खास
-भारतीय क्रिकेटपटू आणि काऊंटी क्रिकेटचे नाते काही खास, पहा कोण कोण खेळलंय आजपर्यंत काऊंटी